रस्त्यावरील खाद्यपदार्थ भारतात जेवढे लोकप्रिय आहेत, तेवढे दुसरे काही नाही. स्ट्रीट फूडचे एक ना अनेक प्रकार मिळतात. आलू टिक्कीपासून ते विविध प्रकारचे डंपलिंग, मोमो, दही वडे आणि सर्वात जास्त म्हणजे पाणीपुरीसारखं दुसरं काही प्रसिद्ध नाही. देशातील क्वचितच असा कोणताही कोपरा असेल जिथं लोकांना पाणीपुरी खायला आवडत नसेल. पाणीपुरी अनेक चवींमध्ये उपलब्ध आहेत, जर तुम्हाला चटपटीत हवे असेल तर तुम्हाला चटपटीत मिळेल आणि तुम्हाला आंबट किंवा गोड हवी असेल तर तशीही मिळेल. तरी बहुतेकांना मसालेदार पाणीपुरी खायला आवडते. जर तुम्हालाही मसालेदार आवडत असेल तर तुम्हाला माहीत आहे का, भारतातील सर्वात मसालेदार पाणीपुरी कुठे मिळते आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, तुम्ही ती मसालेदार पाणीपुरी खाऊ शकाल का? ( Amazing Street Food India Most Spicy Panipuri wala video viral)
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पाणीपुरीचे पाणी बनवताना दिसत आहे. त्याच्या हातगाडीजवळ अनेक लोक पाणीपुरी खाण्यासाठी उभे आहेत. व्हिडिओ वरील कॅप्शन लिहिले आहे, ‘इंडियाज शार्पेस्ट गोलगप्पा’. गरीबपांडा या आयडी नावाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून त्यात लिहिले आहे की, ‘मी एकापेक्षा जास्त पाणीपुरी खाऊ शकत नाही. भगतजींची पाणीपुरी ग्वाल्हेरची सर्वात तिखट पाणीपुरी आहे.. जर तुम्हाला चाट आवडत असेल तर इथं नक्की भेट द्या.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती तो मसालेदार पाणीपुरी खातो आणि तो खाल्ल्याबरोबर तिखट लागते. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 50 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.
व्हिडीओ पाहा:
या व्हिडीओमध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, पाणीपुरीचं पाणी बनवणाऱ्या व्यक्तीने हातात ग्लोव्हजही घातलेले नाहीत. अशा स्थितीत स्वच्छतेबाबत गंभीर असलेले लोक यावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘ग्लोव्ह्ज घाला, कृपया कुणीतरी यांना ते आणून द्या’. त्याचवेळी आणखी एका युजरने ‘पाणीपुरीत हातही धूत असल्याची’ अशी कमेंट विक्रेत्यावर केली आहे.
सध्या भारतासह जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे, त्यामुळे स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. बाहेरचे काहीही खाण्यास मनाई तर आहेच, शिवाय मास्कशिवाय फिरण्याबाबतही सतर्क केले जात आहे. अशा परिस्थितीत, पाणीपुरी किंवा कोणतेही स्ट्रीट फूड केवळ कोरोनाच्याच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक ठरू शकते. स्वच्छतेची काळजी घेऊन तो खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
हेही पाहा: