जंगलाचे जग विचित्र गोष्टींनी भरलेले आहे. इथे कधी कोण कोणाची शिकार करतो याबद्दल काहीच सांगता येत नाही. इथं कधी भांडणाचे तर कधी मैत्रीचे मजेदार व्हिडिओ समोर येत असतात, जे लोकांना खूप आवडतात. कारण, अनेक वेळा शिकारी आपल्या शिकारीवर मात करतो, तर अनेक वेळा त्यांच्याशी मैत्री करुन आपल्याला आश्चर्याचा धक्का देतो. अलीकडच्या काळात मैत्रीचा असाच एक व्हिडिओ इंटरनेटच्या दुनियेत गाजत आहे. जे पाहून तुमचेही लक्ष असेल. (Amazing Video of turtle who shake their hand with crocodile Viral video)
जेव्हाही आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना भेटतो, तेव्हा आपण हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्छा देतो, पण आपण कधीही एखाद्या प्राण्याला हस्तांदोलन करताना पाहिले आहे का? जर नाही, तर असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये दोन जलचर हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मोठे कासव एका धोकादायक मगरीजवळून जाते आणि त्याला स्पर्श करून तेथून निघून जाते. जणू या स्पर्शाने तो तिला ‘हाय’ म्हणत आहे. कासव आणि मगरीचे हे अभिवादन लोकांना खूप आवडले आहे.
हा व्हिडीओ पाहा
Imagine the level of confidence !! ?? pic.twitter.com/31hPV0iazk
— Saket (@Saket_Badola) December 2, 2021
सोशल मीडियावर कासव आणि मगरीच्या या मैत्रीला लोक पसंत करत आहेत. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘त्यांची मैत्री खरोखरच अप्रतिम आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘भावांनो! या कासवामध्ये मोठे धाडस आहे.’ दुसऱ्या यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, ‘मला असे वाटते की, कासव मगरीला हाय-हॅलो म्हणत आहे.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की हा मजेदार व्हिडिओ @Saket_Badola नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शन लिहिले की, ‘तुम्ही आत्मविश्वासाच्या पातळीची कल्पना करू शकता.’ बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.
हेही पाहा: