लोकं कुठेही भांडू शकतात. भांडण ही लोकांची आवडती गोष्ट आहे की काय असा प्रश्न पडतो बरेचदा. जिथे जाईल तिथे भांडण. दुसऱ्याची चूक असली तरी भांडण. आपली असली तरीही भांडण. प्रेम करणं अवघड झालंय, भांडण तितकंच सोप्प झालंय. असे अनेक व्हिडीओ असतात जे नुसतेच भांडणामुळे व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओ मध्ये लोकं विमानात भांडतायत. विमानात? एक जागा सोडली नाही बुआ लोकांनी भांडायची. एका प्रवाशाने फ्लाईट अटेंडंटवर हात उगारलाय. फ्लाईट अटेंडंटने ते भांडण वाढवलं नाही. मुळात त्यांना तसं काही करायची मुभाच नसते. एअरलाइन्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता हा मारामारीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
विमानात फ्लाईट अटेंडंटला पंच मारतानाचा व्हिडिओ समोर आलाय. एका प्रवासी आणि फ्लाइट अटेंडंटमध्ये वाद झाला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.
अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 377 मधली ही घटना आहे. वॉशिंग्टन पोस्टनुसार, एक व्यक्ती अमेरिकन एअरलाइन्सच्या या विमानातून लॉस एंजलिसला जात होता. मेक्सिकोच्या लॉस कॅबोस मधून तो विमानात चढला. या व्यक्तीला फर्स्ट क्लास टॉयलेट वापरायचं होतं.
फ्लाइट अटेंडंटने व्यक्तीला फर्स्ट क्लास टॉयलेट वापरायला परवानगी दिली नाही म्हणून हा वाद झाल्याचं बोललं जातंय. इथे व्हिडिओत प्रवासी फ्लाइट अटेंडंटच्या डोक्यात बुक्का मारताना दिसतोय.
A man was arrested by Los Angeles Airport police after assaulting a flight attendant on an American Airlines flight from Cabo. pic.twitter.com/2VDXxIqUfn
— ??BellaLovesUSA? (@Bellamari8mazz) September 22, 2022
ही घटना घडल्यानंतर हे विमान लॉस एंजेलिस विमानतळावर उतरल्यानंतर काही वेळातच आरोपी प्रवाशाला फ्लाइट अटेंडंटला बुक्का मारल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
प्रवाशाने फ्लाइट अटेंडंटच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरात ठोसा मारला आणि मग तो मागे धावला. त्यानंतर फ्लाइट अटेंडंटने प्रशासकीय पथकाकडे फोनवरून तक्रार केली. अमेरिकन एअरलाइन्स कंपनीने आरोपीला आजीवन विमान प्रवासावर बंदी घातली आहे.