मुंबई : कुणाचं काय तर कुणाचं काय! अमेरिकेच्या एका रॅपरने आपल्या कपाळावर चक्का 11 कॅरेटचा गुलाबी हिरा फिट्ट केला आहे. या रॅपरचं नाव Lil Uzi Vert असं आहे. त्याने बुधवारी (4 फेब्रुवारी) स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कपाळावर हिरा जडलेला व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याच्या 13.9 मिलियन फॉलोअर्सला मोठा धक्काच बसला. Lil ला नेमकं झालं तरी काय? असा प्रश्न अनेकांना हा व्हिडीओ पाहून वाटलं (American rapper lil uzi vert implant pink diamond on his forehead).
रॅपरने कपाळवर लावलेल्या हिऱ्याची किंमत 24 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 175 कोटी रुपये इतकी आहे. या हिऱ्याचे पैसे रॅपर 2017 पासून हप्त्या हप्त्याने देत होता. याबाबत त्याने स्वत: ट्वीट करुन माहिती दिली आहे. त्याने Elliot Eliantte या ज्वेलर कडून हा हिरा खरेदी केला आहे. या ज्वेलरने देखील Lil चा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. काही यूजर्सला रॅपरच्या कपाळावरील गुलाबी हिरा पाहून ‘मार्वल’ मूव्हीच्या व्हिजन स्टोनची आठवण झाली.
I just finished I was paying millions since 2017 . https://t.co/w5CAVWJRwQ
— Uzi London ?☄️?® (@LILUZIVERT) January 30, 2021
Lil Uzi Vert कोण आहे?
Lil Uzi Vert हा सिंगर सध्या 27 वर्षांचा आहे. त्याचं खरं नाव सायमर बायसिल वुड्स असं आहे. मात्र, त्याला जग Lil Uzi Vert या नावाने ओळखतं. त्याचा जन्म 31 जुलै 1994 रोजी अमेरिकेच्या फ्रांसिसविले येथे झाला होता (American rapper lil uzi vert implant pink diamond on his forehead).
वुड्स हा त्याच्या हेअर स्टाईल, टॅटूज आणि कपड्यांमुळे जास्त चर्चेत असतो. मात्र, यावेळी त्याने माथ्यावर हिरा जडल्याने अनेकांना त्याच्या या निर्णयाचं नवल वाटत आहे.