भूकंपासारखी (Earthquake) नैसर्गिक आपत्ती आली तर सगळ्यात आधी माणूस आपला जीव सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडेल. घर, संसार, पैसे, सगळं विसरुन सगळ्यात आधी जिवंत वाचणं, हे महत्त्वाचं असतं, असा विचार जगातला कोणताही सर्वसामान्य माणूस करेल. अर्थात पण जगात असामान्य माणसांचीही काही कमी नाही. एकानं भूकंपाचे जोरदार धक्के बसू लागल्यानंतर जे केलं, ते पाहून भूकंपालाही हादरा बसला असता! भूकंपाच्या भीतीनं लोकं सैरभैर होतात. सुरक्षित ठिकाण शोधतात. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एकादा आडोसा पाहतात. पण एकासाठी या सगळ्यापेक्षाही वेगळीच एक गोष्ट महत्त्वाची होती. जीवापेक्षाही दारु एकाला भूकंपात जास्त प्रिय वाटली. त्यामुळेच भूकंपाचे हादरे बसल्यानंतरही स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा एका माणसानं चक्क आपल्याकडे असलेल्या दारुच्या बाटल्यांना वाचवण्यासाठी धडपड सुरु केली. हा संपूर्ण प्रकार एका कॅमेऱ्यातही (Camera) कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झालाय.
अफगणीस्तानात नुकतेच भूकंपाचे धक्के बसल्यानंतर सोशल मीडियात #earthquake ट्रेन्ड होऊ लागला. या ट्रेन्डला फॉलो करत एकापेक्षा एक मजेदार व्हिडीओ समोर आले आहेत. अशात एक व्हिडीओ भूकंपाच्या धक्क्यात चक्क दारुच्या बाटल्यांना जपताना दिसून आला आहे. टेबलावर ठेवलेल्या दारुच्या बाटल्या भूकंपाच्या हादऱ्यांनी पडण्याची भीती असल्यानं या पठ्ठ्यानं चक्क आपल्या हातांनी त्या बाटल्यांची काळजी घेत धडपड सुरु केली.
सोनाली सिंह नावाच्या एका ट्विटर युजरनं हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ अफगणिस्तानमध्ये आलेल्या भूकंपावेळचा असल्याचाही दावा केला जातो आहेत. 628 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अवघ्या सहा सेकंदाच्या या व्हिडीओवर भन्नाट कमेंन्ट पाहायला मिळाल्या आहेत.
अर्थात जीवापेक्षा कुणाचा काहीच प्यारं नसतं, असं म्हणतात. पण ते या माणसाच्या बाबतीत चुकीचं ठरेलं, असं हा व्हिडीओ पाहिल्यावर कुणीही म्हणेल.
After the #earthquake in #Afghanistan , this man saving his rare collection. ??? pic.twitter.com/aesOyxc6hC
— Sonali Singh (@SonaliS71687712) January 18, 2022
जगात दारुचे शौकिन अनेक लोक आहेत. वेगवेगळ्या प्रकारची दारू, दारुच्या बाटल्या, असा संग्रह करुन ठेवण्याचीही हौस अनेकांना आहे. पण भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीतही हौसेपेक्षा जीवच कुणासाठीही महत्त्वाचा असेल. आणि नैसर्गिक आपत्तीतही जर लोकांना आपली हौसच महत्त्वाची वाटत असेल, तर ती सामान्य माणसं नाहीत, हेही मान्य करावंच लागेल!
पैसे सुट्टे करण्यासाठी लॉटरीचं तिकीट काढलं, 68 वर्षीय पेंटरला थेट 12 कोटींचा जॅकपॉट
रांगेत उभा राहून तरुण कमवतो दिवसाला 16 हजार रुपये
Viral Video : कोणत्या मित्रांपासून दूर राहावं? जाणून घ्या, फक्त 5 सेकंदांत…