नुकतंच मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात एक घटना घडली, ज्यात एक मुलगा अनोळखी व्यक्तीच्या लग्नात शिरला तेसुद्धा जेवायला. या दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला पकडले आणि विचारले तेव्हा तो एमबीएचा विद्यार्थी असून हॉस्टेलमधील जेवण योग्य नसल्यामुळे लग्नात जेवायला आला असल्याचं म्हटला. लग्नात उपस्थित लोकांनी त्याला भांडी घासायला लावली आणि व्हिडिओ बनवून व्हायरल केला. सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती बिनधास्तपणे लग्नाला पोहोचली आणि त्यानंतर नवरदेवाकडे जाऊन सेल्फी व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये त्याने नवरदेवाला स्पष्टपणे सांगितलं की, तो हॉस्टेलमधून जेवणासाठी आला होता.
आयएएस अधिकारी अविनाश शरण (@AwanishSharan) यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले की, “देव तुझं भलं करो”.
45 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नवरदेवाच्या शेजारी येऊन बसला आणि मग म्हणाला, “आम्ही तुमच्या लग्नाला आलो आहोत आणि तुमचं नाव काय आहे आणि घरं कुठे आहेत हे आम्हाला माहीत नाही. आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो, भूक लागली होती, म्हणून आम्ही जेवायला आलो. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?”
मग नवरदेव म्हणाला, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा मुलाने ऑन कॅमेरात कबूल केले की, मी इथून जात असताना इथे जेवणाची पंगत पाहिली, मग आत शिरून जेवलो. आम्ही विचार केला की जे आहे ते तुम्हाला खरं सांगावं.
तेव्हा त्या व्यक्तीने नवरदेवाचे अभिनंदन केले आणि म्हणाला, ‘तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. हे ऐकून नवरदेवाच्या चेह-यावर हसू उमटले आणि तो म्हणाला- तुझ्या हॉस्टेलसाठीही जेवण घेऊन जा. वसतिगृहातील मुलांना जेवण न्या.” मग ती व्यक्ती म्हणते की, “ठीक आहे भाऊ.”
God Bless You.❤️ pic.twitter.com/0Cu0rDdZoI
— Awanish Sharan (@AwanishSharan) December 1, 2022
एखादा विद्यार्थी किंवा हॉस्टेलचा विद्यार्थी लग्नात जेवायला आला तर त्याला अशी वागणूक मिळावी, याचं उदाहरण म्हणून लोक या व्हिडिओकडे पाहत आहेत.
हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आणि स्वत:च्या प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने लिहिले की, ‘मीही अशा लग्नात अनेक वेळा जेवायला गेलो. ही आयुष्यातील एक सोनेरी आठवण आहे,” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “दिल जीत लिया भाई ने”.