Anand Mahindra tweet : सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अलिकडेच अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) जाहिरातीदरम्यान रागावल्याचे ट्विट केले होते. त्यानी ट्विटरवर अजयचा एक व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांना सांगितले, की असे दिसते की आता आपल्याला शहर सोडावे लागेल. अजय देवगणनेही उद्योगपती महिंद्रला उत्तर देताना लिहिले, की ‘आनंद महिंद्रा… मी तुमच्याकडे येतोय.’ आम्ही तुम्हाला सांगतो, की दोन्ही सेलिब्रिटींमध्ये सर्व काही ठीक चालले आहे. अभिनेत्याचा राग येण्याचा व्हिडिओ महिंद्रा ट्रकच्या जाहिरातीचा एक भाग होता. अजय देवगण महिंद्रा ट्रक आणि बसचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. सध्यातरी या दोन्ही सेलिब्रिटींमध्ये ट्विटरवर जोरदार मौज सुरू आहे. याप्रकरणी उद्योगपती महिंद्रांचे नवे ट्विट आता व्हायरल (Viral) होत आहे. हे ट्विटही विनोदी (Funny) आहे आणि सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
OK. So that finally ended well, I guess… So now @ajaydevgn can I ditch the security, and the escape vehicles and head back to town? All clear? ? pic.twitter.com/dO6FfaLYTY
— anand mahindra (@anandmahindra) February 16, 2022
अजय देवगणला केले टॅग
ट्विटरवर सुरू असलेल्या या विनोदी भांडणात उद्योगपती महिंद्रा यांनी अभिनेता अजय देवगणला टॅग करत ट्विट केले आहे, ठीक आहे… मला वाटते आता सर्व काही ठीक आहे. मग मी आता माझी सुरक्षा काढून टाकावी? मी शहरात परत येऊ शकतो का?
I’m on my way… @anandmahindra https://t.co/QCYbmp2hSb pic.twitter.com/5mSzo8o2SQ
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 14, 2022
उद्योगपती महिंद्राच्या पोस्टला आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर 600हून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे. याशिवाय त्यांचे चाहते या पोस्टवर सतत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत असतात. निवडक प्रतिक्रिया बघू या.
So much for free publicity to say oh this happened on Twitter blah blah..nice narrative ! Why would you do that , sir ?
— Rahul A (@thinkdeep_sp) February 16, 2022
ट्विटरवर सक्रिय
आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते जेव्हाही ट्विटरवर एखादी पोस्ट शेअर करतात, तेव्हा ती लगेच व्हायरल होते.
सिंघम के होते आप को सुरक्षा की चिंता नहीं होनी चाहिए।। वो एक मर्द पुलिस वाला है।। ।।।अता मांझी सटक ली।।।कुछ बुझे की नही साहेब।।??????
— Vini @ Mars (@VinayRathee19) February 16, 2022
I think this tweet may have created more suspense (and thus marketing) than the actual advertisement!
— Devendra Tripathi (@tripathidk) February 16, 2022
आणखी वाचा :