Anand Mahindra On FIFA: आनंद महिंद्रा यांनी शेअर केला फुटबॉल प्रेमींचा व्हिडीओ! कॅप्शन त्याहून सुंदर…

| Updated on: Sep 30, 2022 | 3:48 PM

चिअर करायची कसलीच कसर ते सोडत नाहीत. आपल्याकडे फूटबॉल फॅन क्रिकेटच्या तुलनेत फारच कमी.

Anand Mahindra On FIFA: आनंद महिंद्रा यांनी शेअर केला फुटबॉल प्रेमींचा व्हिडीओ! कॅप्शन त्याहून सुंदर...
Anand Mahindra Tweet
Image Credit source: Social Media
Follow us on

भारतात लोकांना क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. कुठलीही मॅच असो, काहीही असो क्रिकेट म्हणलं की लोकं मागे पुढे बघत नाहीत. चिअर करायची कसलीच कसर ते सोडत नाहीत. आपल्याकडे फूटबॉल फॅन क्रिकेटच्या तुलनेत फारच कमी. आपला फक्त क्रिकेटच्या वेळी गोंधळ बघायचा. चिअर करण्यासाठी लोकं गाणी, जाहिराती, पोस्टर्स बॅनर, रॅप काय काय बनवतात. सगळं शोधून काढतात आणि आपल्या भारताच्या टीम चिअर करतात. आयपीएल मध्ये सुद्धा लोकं आपल्या आवडत्या टीम साठी एकमेकांशी अक्षरशः भांडण करतात. असंच काहीसं फुटबॉलच्या बाबतीत आहे. जगात फुटबॉलचं वेड असणारी लोकं प्रचंड आहेत. आनंद महिंद्रांनी हेच एक व्हिडीओ शेअर करताना दाखवून दिलंय.

आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ कतार च्या फुटबॉल फॅन्सचा आहे. लहान मुलांनी फार हौसेने बनवलेला हा व्हिडीओ आहे.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं, “फिफा आणि कतार विश्वचषकस्पर्धेच्या जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च करतील. पण मला वाटत नाही की यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे लोकांना इतका आनंद होऊ शकतो. हा व्हिडीओ फुटबॉलचा अर्थ काय आहे हे जगाला प्रामाणिकपणे सांगतो”

फिफा वर्ल्ड कप 20 नोव्हेंबर पासून सुरु होतोय. फायनल 18 डिसेंबरला होणार आहे. ही स्पर्धा दर चार वर्षांनी होते. एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेची सगळेच जण उत्सुकतेनं वाट पाहतायत.