आज 25 डिसेंबर… जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शनिवारी जगभरात ख्रिसमसचा सण साजरा होत आहे. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि आपापल्या शैलीत या सणाचा आनंद घेतात. बरेच लोक याला मोठ्या दिवसाच्या नावानंदेखील ओळखतात. अशा परिस्थितीत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मुलांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये मुलांनी जुगाड करून पार्टी तयार केलीय आणि ते सर्वजण विश यू अ मेरी ख्रिसमसच्या धूनवर नाचताना आणि गाताना दिसत आहेत.
One video is worth a million words. The Happiness Factory requires no capital. Merry Christmas to you all.. pic.twitter.com/db16oitjDf
— anand mahindra (@anandmahindra) December 25, 2021
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, की काही मुलांनी एक वर्तुळ तयार केल्याचं दिसतं. या सर्वांनी बनवलेली वाद्ये टांगली आहेत. व्हिडिओमधील मुलांमध्ये तात्पुरत्या वस्तू जसे की बादल्या, लाकडाचे तुकडे, तसंच यापुढे वापरता येणार नाहीत, अशा वस्तूंचा समावेश आहे. हा व्हिडिओ आपल्याला एक संदेश देतो, की प्रत्येक परिस्थितीची सकारात्मक बाजू पाहिल्यास, आशावादी राहिल्यास आणि आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतल्यास आपण खूप आनंदी होऊ शकतो.
व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘एक व्हिडिओ लाखो शब्दांचा आहे. हॅपीनेस फॅक्टरीला भांडवल लागत नाही. तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा.” या व्हिडिओला ७२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर मुलांचा सहभाग आणि मेहनत लोकांना खूप आवडलीय. याच कारणामुळे अनेक युझर्सनी त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या. एका युझरनं लिहिलं, की ‘अग्नीपाखरांनी रात्र उजाळा, सूर्याचा मार्ग दिसला तर समुद्र होईल.’ तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, की पैशानं आनंद विकत घेता येत नाही.