मुंबई : संपूर्ण देश आज कोरोना महामारीशी झुंजत आहे. कोरोनामुळे दररोज हजारो नागरिकांचा बळी जातोय. या भयावह काळात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात टाकून अहोरात्र झटत आहेत. मात्र, आता आरोग्य यंत्रणाही अपुरी पडू लागली आहे. कारण दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येपुढे आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. या भयानक परिस्थितीशी संबंधित एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे अनेक युजर्स हळहळले आहेत (Anand Mahindra share emotional videos).
व्हिडीओत नेमकं काय?
आनंद महिंद्रा यांनी कोको कोला कंपनीच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्याच्या कोरोना परिस्थितीवर आधारित आहे. सध्याच्या नकारात्मक काळात हा व्हिडीओ एक आशावादी असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओत लोक एकमेकांना कशाप्रकारे मदत करत आहेत, त्या विषयावर भाष्य करण्यात आलंय. कोका-कोला कंपनीने या जाहिरातीतून आशावादचा संदेश दिल्यामुळे आनंद महिंद्रा यांनी कंपनीचे आभार मानले आहेत (Anand Mahindra share emotional videos).
सध्याच्या परिस्थितीवर साधर्म्य साधणारा व्हिडीओ
खरंतर हा व्हिडीओ आताचा नाही. भारतात जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला होता त्यावेळेचा हा व्हिडीओ आहे. मात्र, हा व्हिडीओ सध्याच्या परिस्थितीशी साधर्म्य साधणारा आहे. त्यामुळे तो अनेकांना आपल्या जवळचा वाटत आहे. व्हिडीओ बघितल्यानंतर अनेकांना व्हिडीओतील व्यक्ती आपण किंवा आपल्यासारखंच कोणीतीरी आहे, असं भासत आहे.
व्हिडीओवर अनेकांच्या भावनिक प्रतिक्रिया
“आशावाद, एक सार्वभौमिक धर्म जो आपल्या सर्वांचा होऊ शकतो”, असं आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी कमेंट केल्या. या व्हिडीओवर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या. कुणी डोळ्यांमध्ये पाणी आलं, असं म्हटलं तर कुणी सध्याच्या घडामोडींवर मार्मिक भाष्य करणारा व्हिडीओ असल्याचं म्हटलं.
Optimism. A universal religion we can all belong to… Thank you Coca Cola pic.twitter.com/IAen8i4tCl
— anand mahindra (@anandmahindra) April 29, 2021
हेही वाचा : जुलै, ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार : राजेश टोपे