उलट्या धबधब्यावर Anand Mahindra देखील लट्टू, म्हटले निसर्गाकडून हे शिका

| Updated on: Oct 16, 2023 | 1:43 PM

आनंद महिंद्र यांनी महाराष्ट्रातील एका प्रसिध्द धबधब्याचा व्हिडीओ शेअर करीत निसर्गाकडून माणसाने त्यातून शिकण्याचा सल्ला दिला आहे.

उलट्या धबधब्यावर Anand Mahindra देखील लट्टू, म्हटले निसर्गाकडून हे शिका
anand mahindra - kalu waterfall
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : महिंद्र ग्रुपचे चेअरमन उद्योगपती आनंद महिंद्र ( Anand Mahindra ) सोशल मिडीयावर नेहमीच प्रेरणादायी पोस्ट शेअर करीत आपले विचार मांडीत असतात. त्यांनी ‘मंडे मोटीव्हेशन’ अंतर्गत निसर्गाचा चमत्कार असलेल्या महाराष्ट्रातील सातारा येथील काळू धबधबा या उलट्या वाहणाऱ्या धबधब्याचा व्हिडीओ शेअर करीत कौतूक केले आहे. या धबधब्याचे पाणी पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यामुळे हवेत उलट्या दिशेने उडत असते म्हणून त्याला उलटा धबधबा म्हणतात.

सातारा येथील उलट्या धबधब्याचा व्हिडीओ आनंद महिंद्र यांनी ट्वीटर ( एक्स ) व्हायरल केला आहे. महिंद्र यांनी लिहीले आहे की, महाराष्ट्रातील काळू वॉटरफॉल. पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे याचे पाणी वरच्या दिशेने पडतं असा भास होतो. जेव्हा अशा अनियंत्रित संकटांचा धबधबा आपल्याला भिजवतो तेव्हा आपल्यालाही अशा संकटांना वरच्या दिशेने उडवून लावता येईल का ?

महिंद्र यांचे ट्वीट येथे पाहा –

आनंद महिंद्र यांच्या या पोस्टला अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की खरोखरच काळू वॉटरफॉल सुंदर आहे. अशा अविश्वसनीय घटनांमुळे आपल्याला निर्सगाच्या शक्तीची कल्पना येते आपण निर्सगाकडून शिकू शकतो. काळु धबधब्याप्रमाणे आपल्यालाही परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्याला हवेत तसे वळविण्याची आणि आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती आणि आपल्याला अधिक भक्कमपणे आव्हानांसमोर उभे राहण्याची ताकद मिळो. अन्य एका युजरने म्हणले आहे की आपल्याकडे असे अनेक धबधबे आहेत त्यांना पावसाळ्यात असा सुंदर चमत्कार पाहायला मिळतो. त्यांना संरक्षित करायला हवे. असा धबधब्यात रॅपलिंग करण्यात खरी मजा आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले की धन्यवाद सर, आमच्या मुरबाडचा निसर्ग सुंदर आहे. ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटात धबधब्याचं सौदर्य पहाण्यासारखे आहे. गेल्या महिन्यात 14 सप्टेंबर रोजी महिंद्र हॉलिडे एण्ड रिसॉर्टने उत्तराखंड सरकारशी करार केला आहे.