नवी दिल्ली: प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांचा सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलवर आहे. ते कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेळात वेळ काढून ते आपले विचार, आपल्याकडील कल्पना सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला नेटकरी देखील भरभरून प्रतिसाद देतात. आनंद महिंद्रा यांनी नुकतेच केरळमधील कोचीचे काही मनमोहक छायाचित्रे आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. ही छायाचित्रे शेअर करताना महिंद्रा यांनी त्याला ‘कोची देवाची आपली भूमी’ असे कॅप्शन दिले आहे. आनंद महिद्रा यांच्या या छायाचित्राला तब्बल पाच हजार लोकांनी लाईक केले आहे.
आनंद महिंद्रा यांनी 2 डिसेंबरला ही छायाचित्रे ट्विट केली होती. ही छायाचित्रे नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत असून, लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. एका ट्विटर यूजरने म्हटले आहे की, माझे गाव केरळमध्ये नाही, परंतु जेव्हा केव्हा पर्यटनाचा विचार मनात येतो, तेव्हा सर्वप्रथम केरळच डोळ्यासमोर दिसते. दुसऱ्या एका ट्विटर युजरने म्हटले आहे की, केरळमध्ये अशी काही पर्यटनस्थळे आहेत, तुम्ही कितीदा जा तुमचे मन भरत नाही. तुम्ही तुमच्या परिवारासोबत काही दिवस केरळमध्ये व्यतीत करू शकता. तर आणखी एकाने म्हटले आहे की, केरळ हा खरच देवाने बनवलेला देश आहे. केरळची निसर्गसंपन्नता अद्भूत आहे.
केरळ हे भाराताचे दक्षिणेकडील राज्य आहे. केरळला देवभूमी म्हणून देखील ओळखले जाते. केरळला निसर्गाचे वरदान लाभले आहे. वर्षभर पर्यटकांची राज्यात गर्दी असते. पौराणिक कथानुसार देवतांनी या राज्याची निर्मिती केली आहे. भगवान परशुराम यांच्या परशुतून या राज्याची निर्मिती झाली असे मानण्यात येते. त्यांनी आपला परशु पाण्यात फेकला आणि तिथे जमीनीची निर्मिती झाली अशी अख्यायिका आहे.
God’s own country? Yes indeed. Without exaggeration. #Kochi pic.twitter.com/E5UUsgFYcM
— anand mahindra (@anandmahindra) December 2, 2021
मी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन
Video: चालायला शिकण्याच्या वयात चिमुरड्याची रेसलिंग, लोक म्हणाले, हा भविष्यातील Hulk आहे!