नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्यक्तीला भेटण्यासाठी आनंद महिंद्रा खूप इच्छुक आहेत. या व्हिडीओ मध्ये एका व्यक्तीची जबरदस्त कल्पना आनंद महिंद्रा यांनी शेअर केलीये. या व्यक्तीचं अक्षरशः भरभरून कौतुक केलंय. व्हिडीओ बघून तुम्हालाही हेच वाटेल. लोकसंख्या जास्त असलेल्या देशात अशा कल्पकतेची खूप गरज आहे असं मत खुद्द आनंद महिंद्रा यांनी मांडलंय. काय आहे ही कल्पना? काय आहे जे आनंद महिंद्रांना प्रचंड आवडलंय? बघुयात हा व्हायरल व्हिडीओ…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने चालत्या ट्रकला लग्नाचा हॉल कसा बनवला. व्हिडिओ पाहून तुम्हाला “अरे क्या बात है…” असं म्हणायची इच्छा होईल.
I’d like to meet the person behind the conception and design of this product. So creative. And thoughtful. Not only provides a facility to remote areas but also is eco-friendly since it doesn’t take up permanent space in a population-dense country pic.twitter.com/dyqWaUR810
— anand mahindra (@anandmahindra) September 25, 2022
आधी ट्रक वाटणाऱ्या या गाडीचं रूपांतर एका सुंदर अशा लग्न मंडपात होतं. 200 लोकांची कपॅसिटी असणारा हा लग्न मंडप दिसायला इतका सुंदर असतो की आत गेल्यावर कुणालाही वाटणार की हा एक ट्रक आहे. आनंद महिंद्रांनी या व्यक्तीचं जे कौतुक केलंय ते खोटं नाही.
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, या प्रोडक्टची संकल्पना आणि डिझाइन खूप क्रिएटिव्ह आहे. हा विचार अंमलात आणणाऱ्या व्यक्तीलाही मला भेटायचे आहे. हा जुगाड केवळ दुर्गम भागात सुविधाच देत नाही तर इको फ्रेंडलीही आहे कारण अशा विवाह हॉलमुळे जास्त लोकसंख्येच्या देशातील जागा वाचते.
हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर अवघ्या 2 मिनिटांच्या या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि रिट्विट मिळाले आहेत.
कमेंट सेक्शनमध्ये अनेक लोक (सोशल मीडिया यूजर्स) आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. या जुगाडासाठी त्या व्यक्तीने आपलं डोकं चालवलं असणार हे व्हिडीओ बघून लक्षात येतं.