भारत हा उत्साही देश आहे! नाही का? आला गणपती, नाचा. लग्न असेल, नाचा. आली नवरात्र नाचा! सगळे सणवार नाचून साजरं करणं ही आपली आवडती गोष्ट. आपल्याला उत्साहाला तोड नाही. सोशल मीडियावर सुद्धा आपले जे व्हिडीओ व्हायरल होतात त्यात पण आपला उत्साह दिसून येतो. आपली लोकं अक्षरशः कुठेही नाचू शकतात. फक्त गाणं पाहिजे, बास. आता नवरात्र आहे. आनंद महिंद्रांनी एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात मुंबईचे लोकं मरीन ड्राइव्हवर गरबा करतायत. हा व्हिडीओ उत्साहाने भरलेला आहे.
आनंद महिंद्रांचा हा व्हिडीओ नवरात्र स्पेशल आहे. व्हिडीओ पोस्ट करताना आनंद महिंद्रांना आपल्या संस्कृतीवर, मुंबईवर खूप गर्व असल्याचं दिसून येतंय.
Mumbai, Marine drive. The conquest and annexation of Mumbai’s streets is complete. But these are invaders who are welcomed with open arms. No place like Mumbai during Navratri. ( I know I’m going to hear howls of protest from cities in Gujarat! ?) pic.twitter.com/vaGNSVSybE
— anand mahindra (@anandmahindra) September 27, 2022
व्हिडीओमध्ये संगीताच्या तालावर लोकं रस्त्यावर गरबा करतायत, लोकांची गर्दी दिसत आहे. ते सगळेच नाचताना दंग आहेत. ते खूप छान नाचतायत को-ऑर्डिनेशन कमाल आहे.
व्हिडीओ पोस्ट करताना आनंद महिंद्रा म्हणतात, नवरात्रीत मुंबई सारखी दुसरी जागा नाही. मी गुजराती असल्यामुळे कदाचित माझा गुजरातमध्ये या वाक्यासाठी निषेध केला जाऊ शकतो. कमालीचं कॅप्शन देऊन आनंद महिंद्रा या व्हिडीओचं, या लोकांचं आणि अर्थातच मुंबईचं कौतुक करतायत.
हा व्हिडीओ बऱ्याच लोकांना आवडलाय. यात कुणी मुंबईचं कौतुक केलंय तर कुणी गुजराती संस्कृतीचं. कुणी म्हणतंय मुंबई म्हणजे मेल्टिंग पॉइंट. गणपती, नवरात्री एक प्रकारचं गेट टुगेदर आहे असंही लोकांचं मत आहे.
Navratri , like Ganesh Chathurthi, is a community gathering , not a religious process .. I wish that fervour and tradition is maintained ! https://t.co/lhTaMF9t0U
— Krishnan Arunachalam (@MaximusKrish) September 27, 2022
Mumbai- a melting point of cultures♥️ https://t.co/hSku4OIkp9
— Introvert Ultra Max Pro (@introvert_ultra) September 27, 2022