देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा पुन्हा एकदा त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी व्हायरल झालेल्या प्रसिद्ध ‘मटका मॅन’ची प्रेरणादायी कथा शेअर केली आहे. ही कथा एका अशा व्यक्तीची आहे जो गरजूंना पाणी पुरवठा करतो. शहरातील लाखो लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेवर निघालेल्या दिल्लीचा अवलिया नटराजनची इथं चर्चा होत आहे. आधी इंग्लडमध्ये राहणारे नटराजन आता दिल्लीकरांची तहान भागवत आहेत. (Anand Mahindra Shares Matkaman video story Netizens praises him for highlighting such real life heroes)
उद्योगपती महिंद्राने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर मटका मॅनचा 1 मिनिटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सुरुवातीला नटराजन बोलेरो पिकअपसमोर उभे असलेले दिसतात. या दरम्यान, एक निवेदक त्याची कथा सांगतो आणि सांगतो की त्याने एक SUV कशी खरेदी केली आणि ती स्वतःच्या आवडीनुसार कशी बनवली. कस्टमाइझ केल्यानंतर, या एसयूव्हीमध्ये सुमारे 200 लिटर पाणी वाहून नेले जाऊ शकते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नटराजन यांच्या बोलेरोवर महात्मा गांधी, लिओ टॉल्स्टॉय आणि डब्ल्यूएच ऑडेन यांची प्रसिद्ध वाक्य लिहलेली आहेत. उद्योगपती महिंद्रानेही नटराजन यांचे त्यांच्या मिशनमध्ये बोलेरो वापरल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
चला तर मग पाहूया काय आहे या व्हिडिओमध्ये.
A Superhero that’s more powerful than the entire Marvel stable. MatkaMan. Apparently he was an entrepreneur in England & a cancer conqueror who returned to India to quietly serve the poor. Thank you Sir, for honouring the Bolero by making it a part of your noble work. ?? pic.twitter.com/jXVKo048by
— anand mahindra (@anandmahindra) October 24, 2021
आनंद महिंद्रा यांनी 24 ऑक्टोबरला हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एक सुपरहिरो जो मार्वल सुपरहिरोंपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. हा मटका माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो की तो एक उद्योजक आणि कर्करोगावर मात केलेला व्यक्ती आहे, जो पूर्वी इंग्लंडमध्ये राहत होता. पण गरीब आणि गरजूंची सेवा करण्यासाठी ते भारतात परतले आहेत.” बोलेरोला आपल्या मोहिमेचा भाग बनवल्याबद्दल आनंद महिंद्रा यांनी नटराजनचेही आभार मानले आहेत.
या व्हिडिओ स्टोरीला आतापर्यंत 66 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. त्याचबरोबर आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट 455 वेळा रिट्विट करण्यात आली आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. यावर लोक सतत आपापल्या प्रतिक्रिया देत असतात. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, अशा रिअल लाईफ हिरोची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद सर.
नटराजन यांनी घराबाहेर मातीचे भांडे ठेवून या मोहिमेची सुरुवात केली होती. आता ते संपूर्ण दक्षिण दिल्लीतील गरजूंसाठी पिण्याचे पाणी भांड्यांमध्ये देतात. नटराजन यांच्या या उपक्रमामुळे त्यांना ‘मटका मॅन’ म्हणून ओळख मिळाली आहे.
हेही पाहा: