Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रांना हे फोटो आवडले, ट्विट करत केलं कौतुक! व्हायरल

| Updated on: Sep 18, 2022 | 4:58 PM

अहो इतकंच काय आनंद महिंद्रा तर लोकांना रिप्लाय सुद्धा देतात. आता आनंद महिंद्रांनी एका फोटोग्राफरचं कौतुक केलंय. त्यांनी त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो आपल्या ट्विटर हॅन्डलवर शेअर केलेत. या फोटोग्राफरने आनंद महिंद्रांचं मन जिंकलंय

Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रांना हे फोटो आवडले, ट्विट करत केलं कौतुक! व्हायरल
Anand Mahindra Viral Tweet
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

आनंद महिंद्रा नेहमीच लोकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करत असतात. ते नेहमीच वेगवेगळे पोस्ट करतात जे लोकांच्या उपयोगी पडतात. कधी जुगाड, कधी प्रेरणा, कधी एखादी कलाकृती. लोकं कधीच त्यांच्या ट्विटरवरच्या पोस्ट चुकवत नाहीत. अहो इतकंच काय आनंद महिंद्रा तर लोकांना रिप्लाय सुद्धा देतात. आता आनंद महिंद्रांनी एका फोटोग्राफरचं कौतुक केलंय. त्यांनी त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो आपल्या ट्विटर हॅन्डलवर शेअर केलेत. या फोटोग्राफरने आनंद महिंद्रांचं मन जिंकलंय.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एका माणसाचे फोटोग्राफी कौशल्य लोकांसोबत शेअर केले आहे. या फोटोंमध्ये फोटोग्राफरने मुसळधार पावसातही मुंबई पोलिसांना आपलं कर्तव्य बजावताना कैद केलं आहे.

व्हायरल फोटोज पाहा…

या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी फोटोग्राफरला कॅप्शनच्या माध्यमातून टॅग करत म्हटलं आहे की, “अतिशय आश्चर्यकारक फोटोज, हवामान कितीही विचित्र असलं तरी सतत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या या ‘शहरी सैनिकां’च्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आलंय. आपण त्यांना नेहमीच गृहीत धरतो.” अनेकांनी या फोटोग्राफरचं कौतुक केलं.

हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांचं खूप लक्ष वेधले जात आहे. या फोटोला आतापर्यंत हजारो लोकांनी (सोशल मीडिया युजर्स) लाईक केले आहे.

महिंद्रा यांचे हे ट्विट अनेकांनी रिट्विटही केले आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसतायत.