आनंद महिंद्रा यांना हा व्हिडीओ बघून वाटला प्रचंड अभिमान!

| Updated on: Feb 22, 2023 | 6:02 PM

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि अनेकांना प्रोत्साहन देत असतात. अनेकदा ते स्वत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मदत करताना दिसले आहेत.

आनंद महिंद्रा यांना हा व्हिडीओ बघून वाटला प्रचंड अभिमान!
Anand mahindra tweet
Image Credit source: Social Media
Follow us on

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि अनेकांना प्रोत्साहन देत असतात. अनेकदा ते स्वत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मदत करताना दिसले आहेत. अनेकदा ते आपल्या उत्पादनांचं कौतुकही करताना दिसतात. या प्रकरणात एक ट्विट समोर आले आहे ज्याद्वारे त्याने एका ट्रॅक्टर मालकाला उत्तर दिले आहे. ट्विटरवर एका युजरने महिंद्रा ट्रॅक्टरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक जुना ट्रॅक्टर उसाने भरलेली ट्रॉली शेतात खेचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये युजरने लिहिलं आहे की, हा ट्रॅक्टर 1988 पासून आमच्यासोबत आहे. त्याची स्थिती अगदी बरोबर आहे. सध्या ते उसाची वाहतूक करत आहेत. हा ट्रॅक्टर सुमारे 35 वर्षांपासून आमच्यासोबत आहे आणि यातून सातत्याने मेहनत घेतली जात आहे.

आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट शेअर केलं आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, आम्हाला खूप आनंद होत आहे की आमचे ट्रॅक्टर खूप काळ टिकतात. या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर भरलेली ट्रॉली ओढताना दिसत आहे. या ट्रॉलीमध्ये इतका ऊस भरलेला आहे की ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त वजन खेचत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.

काही लोकांना त्यांच्या जुन्या ट्रॅक्टरचीही आठवण झाली आहे. त्यावर ते प्रतिक्रियाही देत आहेत. ट्रॅक्टरला शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हटले जाते. ट्रॅक्टरही अनेक वर्षे चालतात. हीच गोष्ट या व्हिडिओमध्ये दिसत आहे, एक ट्रॅक्टर आपली ट्रॉली घेऊन कच्च्या रस्त्यावर कसा जात आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीवर ऊस भरला जातो. सध्या हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे.