गणपती बाप्पाचं (Ganpati Bappa) आगमन लवकरच होणार आहे. सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरुये. सोशल मीडियावर सुद्धा बाप्पाचे व्हिडीओज फोटोज शेअर केले जातायत. यात आनंद महिंद्रा सुद्धा मागे राहिलेले नाहीत. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमीच काही ना काही अर्थपूर्ण शेअर करत असतात. बाप्पाच्या आगमनाचं औचित्य साधून त्यांनी सुद्धा एक खूप छान व्हिडीओ ट्विटरवर (Twitter Account Anand Mahindra) शेअर केलाय. त्यांनी सोशल मीडियावर अनेकांना आपला चाहता बनवलं आहे. त्यांनी शेअर केलेला कंटेंट अनेकांना आवडतो. यावेळीही महिंद्राने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे श्रीगणेश भक्तांना खूप आनंद झाला. तसे पाहिले तर आनंद महिंद्रा नेहमीच प्रतिभावान लोकांचे कौतुक करताना आणि त्यांना मदत करताना दिसतात. पण या मुलाची प्रतिभा पाहून तुम्हीही त्या मुलाला सलाम कराल असा हा मुलगा आहे.
या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा गणपतीच्या मूर्तीवर कोरीव काम करताना दिसत आहे. या मुलाच्या हाताची जादू पाहून आनंद महिंद्रा प्रभावित झाले. कॅप्शनमध्ये महिंद्राने या मुलाचं खूप कौतुकही केलं आहे.
या व्हिडिओसोबत आनंद महिंद्रा म्हणाले की, या मुलाचे हात एखाद्या महान शिल्पकारासारखे फिरतात. मला आश्चर्य वाटते की यासारख्या मुलांना त्यांच्या पात्रतेचे प्रशिक्षण मिळते की त्यांना त्यांची कला सोडावी लागते? महिंद्रा यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापासून लोक स्वतःला रोखू शकले नाहीत. मात्र, सर्वजण या टॅलेंटचं कौतुक करतानाही दिसली.
His hands move with the fluency of a great sculptor. ?????? I wonder if kids like him get the training they deserve or have to abandon their talent…? https://t.co/XzMgeg930q
— anand mahindra (@anandmahindra) August 28, 2022
हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर हजारो लोकांनी (सोशल मीडिया युजर्स) हा व्हिडिओ लाईकही केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत होते. काही लोक आश्चर्यचकित झालेले दिसले, तर काहींना अभिमान वाटला. गणेश चतुर्थीसाठी भारतीयांमध्ये नेहमीच उत्साह असतो, गणपतीची मूर्ती हाही एक आवडीचा भाग आहे.