अनेकदा आपण रद्दीत पडलेल्या मालाला तितकंसं महत्त्व देत नाही, पण जेव्हा त्याचा उपयोग होतोय हे कळतं तेव्हा तो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. जे लोक हस्तकलेत रस घेतात, क्रिएटिव्ह (Creative) असतात त्यांच्याकडे जंकमध्ये पडलेल्या वस्तूंना कामाची गोष्ट बनविण्याचे कौशल्य असते. देसी जुगाडच्या मदतीने एका माणसाने एका झाडाची फळे तोडण्यासाठी कॅचर (Fruit Catcher) बनवले, ज्यामुळे लोकांना चांगलंच आश्चर्य वाटलं. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही हा व्हिडिओ शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी झाडांपासून फळे तोडण्यासाठी एका साध्या घरगुती उपायाचा (एक जुगाड) व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ इंटरनेट युजर्सनी 4,00,000 हून अधिक वेळा पाहिलाय. आनंद महिंद्रा हा व्हिडीओ बघून अत्यंत प्रभावित झाले. व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती लांब काठीचा वापर करताना दिसत आहे, ज्याच्या शेवटी प्लास्टिकची बाटली आहे. तो त्या बाटलीच्या साहाय्याने झाडावरून फळं तोडण्याचा प्रयत्न करतोय. या वृद्ध व्यक्तीने मस्त जुगाड लावलाय, ही बाटली मागील बाजूस चार भागात उघडते आणि नंतर फळ पकडल्यानंतर बंद होते.
या व्हिडीओमध्ये हे उपकरण माणसाने कसं बनवलं, हेही पाहायला मिळतंय. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्विट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा फार मोठा शोध नाही, परंतु मी उत्साही आहे कारण हा छोटासा शोध आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंबित करतो. बेसमेंट-गॅरेज वर्कशॉप्समध्ये प्रयोग करण्याच्या सवयीमुळे अमेरिका हे आविष्काराचे पॉवरहाऊस बनले. असे छोटे संशोधकही संशोधनाचे टायटन्स बनू शकतात.” सोशल मीडियावर या व्हिडिओला लाईक केले जात आहे.
Not an earth-shattering invention. But I’m enthusiastic because it shows a growing culture of ‘tinkering.’ America became a powerhouse of inventiveness because of the habit of many to experiment in their basement/garage workshops. Tinkerers can become Titans of innovation. ?????? pic.twitter.com/M0GCW33nq7
— anand mahindra (@anandmahindra) June 2, 2022
हा व्हिडीओ खरं तर फार उपयोगाचा व्हिडीओ आहे. टाकाऊ पासून टिकाऊ हे आपण फक्त ऐकलंय. हे उपकरण बनवायला फक्त एक साधी प्लॅस्टिकची बाटली, एक नायलॉनची दोरी लागते. या उपकरणाने हा माणूस झाडावरचे पेरू सहज तोडतोय. कितीही उंचीवर फळ असलं तरी सहजच या उपकरणाने फळं तोडता येऊ शकतात.