महिंद्रा अँड महिंद्राचे कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा एक यशस्वी व्यावसायिक आहेत. ते लोकांना प्रेरित करण्याचे काम करतात. आनंद महिंद्रा दररोज आपल्या ट्विटर हँडलवर आपल्या फॉलोअर्ससाठी मोटिव्हेशनल स्टोरी पोस्ट करतात. यावेळीही असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही प्रेरित व्हाल आणि आयुष्यातील प्रत्येक मौल्यवान क्षणाची कदर करायला शिकाल. “बाज की नजर रखो” असं तुम्ही अनेकांना म्हणताना ऐकलं असेल. खरं तर गरुडाचे डोळे अतिशय तीक्ष्ण, इतके तीक्ष्ण असतात की ते आकाशातून सहजपणे आपली शिकार पाहतात आणि जमिनीवर येऊन त्यांना पकडून आकाशात जातात. त्यामुळे त्यांना धोकादायक शिकारी पक्षी मानले जाते, ज्यांची ताकद आणि डोळे सगळ्यांनाच दिसतात. सध्या समोर आलेला व्हिडिओ थोडा आश्चर्यचकित करणारा आणि वेगळा आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस कसलाही विचार न करता नदीत पोहातोय. त्याच्यावर कुठल्या प्रकारचं संकट येऊ शकतं हेही त्याच्या ध्यानी मनी नाही.
आनंदाने पोहत असताना या दरम्यान त्याच्या पाठीमागून एक गरुड येतो. तो हल्ला करण्यासाठी त्या माणसाच्या वर फिरू लागतो. ती व्यक्ती पोहताना पाण्याच्या पृष्ठभागावर येताच गरुड आपल्या धारदार चोचीने हल्ला करण्याचा विचार येतो. परंतु अचानक त्याचे काय होते माहित नाही आणि तो त्या माणसाला इजा न पोहोचवता परत येतो.
Sometimes you’re watched over & looked after without even realising how blessed & fortunate you are…We need to feel gratitude for every day that seems just ‘normal,’ pic.twitter.com/osbez0Db3O
— anand mahindra (@anandmahindra) January 20, 2023
हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलं आहे की, ‘आपल्याला नॉर्मल वाटणाऱ्या प्रत्येक दिवसाबद्दल आपण कृतज्ञ असायला हवं..! हा व्हिडिओ नऊ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यावर कमेंट्स दिल्या जात आहेत.
एका युजरने लिहिले की, ‘देवाकडून येणारा प्रत्येक क्षण खरोखरच मौल्यवान आहे,’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘आयुष्यातील प्रत्येक दिवस संधी म्हणून घेतला पाहिजे. तो वाया जाऊ नये.’