भारतात माकडांची कमतरता नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात माकडं उड्या मारताना बघायला मिळतील. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते दिवसभर उड्या मारत, इकडे तिकडे गोंधळ घालत राहतात. शहरांमध्ये, त्यांची संख्या खूपच कमी आहे, कारण ते बहुतेकदा त्याच ठिकाणी आढळतात, जिथं झाडं आणि हिरवळ असते. त्यामुळेच गावात माकडांची संख्या अधिक असून त्यांच्या उड्याही पाहायला मिळतात. खेळताना माकडं भडकतात आणि लोकांवर रागावतात, असं अनेकदा घडतं, पण असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यांच्यात माणुसकी असल्याचंही दिसून आलं.
सध्याच्या व्हिडिओमध्ये एका माकडाच्या हातात काठी आहे, पण वृद्धाला त्या काठीची गरज असल्याचं दिसतं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वृद्ध व्यक्ती काठीच्या मदतीने रस्त्यावर उभा आहे आणि तो रस्त्याच्या कडेला बसलेल्या माकडाकडून एक छोटी काठी मागतो आहे. माकडही म्हाताऱ्याला लगेच काठी उचलून त्याला द्यायला पुढे जातो. मात्र, यावेळी त्याला म्हातारा आपल्याला मारेल, अशी भीतीही वाटत असल्याने तो थांबून थोडावेळ विचार करतो, त्यानंतर लगेचच त्या वृद्धाला काठी देऊन तेथून पळ काढतो.
व्हिडीओ पाहा:
हा व्हिडिओ माकडाच्या माणुसकीचे खरं दर्शन घडवतो. सहसा हे क्वचितच पाहायला मिळतं, त्यामुळे लोक हा व्हिडिओ खूप पसंत करत आहेत. ब्युटीफुलग्राम या नावाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 53 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 2,600 हून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘प्राण्यामध्ये माणुसकी असते, पण यावेळी व्यक्तीमध्ये माणुसकी नसते’. त्याच वेळी, अनेक युजर्सनी व्हिडिओवर विविध प्रकारचे इमोजी पाठवून हा व्हिडिओ खूप चांगला असल्याचे दाखवले आहे. यातून प्रत्येकाने धडा घ्यावा आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी माणुसकी दाखवून नक्कीच मदत करावी.
हेही पाहा: