सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ समुद्रकिनाऱ्याचा आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महाकाय सरड्यासारखा प्राणी समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे. हा प्राणी इतका भयंकर दिसतोय की त्याला पाहून कोणाच्याही हृदयाचे ठोके वाढतात. व्हिडिओमध्ये काही लोक बीचवर फिरतानाही दिसत आहेत. पण त्यांना बघून जणू काही त्यांची नजर या प्राण्यावर पडलीच नाही. (Animal Viral video mysterious animal seen on the beach netizens says its a mini godzila but its a marine laguna lizard from galapagos islands)
हा व्हिडिओ oceanic.touch नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मिनी गॉडझिला समुद्रकिनाऱ्यावर तुमच्याकडे येताना दिसल्यास तुम्ही काय कराल?’
या प्राण्याचं नाव आहे तरी काय?
दरम्यान हा प्राणी कुठला आहे हा अनेकांना प्रश्न पडला असेल. तर हा आहे marine laguna lizard. सरड्याच्याच प्रजातीतील एक प्राणी. दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर या देशातील एका बेटावर हा आढळतो. गॅलापॅगोस नावाच्या बेटावर हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. रॉबेट्रो ओशाव या समुद्री जीवनाचं चित्रिकरण करणाऱ्या निर्मात्यानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो नंतर oceanic.touch नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. हा प्राणी सरड्याच्या प्रजातीतील असला तरी तो समुद्रात पोहण्यात एक्सपर्ट आहे. खोल समुद्रात जाऊन तो आपलं पोट भरतो. शिवाय हा समुद्र किनाऱ्यावरही येतो. माणसांना यापासून फार कमी धोका असतो, त्यामुळे दिसायला भयानक असला तरीही याला स्थानिक लोक घाबरत नाही.
व्हिडीओ पाहा
या व्हिडिओला आतापर्यंत 22 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या अव्याहतपणे सुरू आहे. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, वापरकर्ते सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोकांनी अॅडमिनला प्रश्न केला आहे की, हा कोणता प्राणी आहे? त्याच वेळी, काहींना तो इगुआनासारखा दिसतो. तथापि, असे काही वापरकर्ते आहेत ज्यांना हा प्राणी पाहिल्यानंतर ज्युरासिक पार्क चित्रपटाची आठवण झाली असल्याचं सांगितलं. एका युजरवर कमेंट करताना लिहिले की, ‘हा खूप भयानक प्राणी आहे. व्हिडीओ बनवण्यापेक्षा ओरडत पळून जाणे चांगले.” त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, हा प्राणी मोठ्या सरड्यासारखा दिसतो. मी माझ्या घराच्या मागील अंगणातही मी पाहिला आहे.
हेही पाहा: