संगीताचा लोकांवर नेहमीच सकारात्मक परिणाम होत असतो, हे आपण अनेकदा पाहिले आहे. संगीत ऐकून लोक मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. मन आणि शरीर दोन्ही शांत करण्यासाठी संगीताचा आधार घेणारेही काही जण आहेत. संगीताची शक्ती केवळ मानवाला लागू होत नाही, हे अनेकदा दिसून आलंय. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये संगीताचे प्राण्यांवर होणारे सकारात्मक परिणामही पाहायला मिळालेत. एक माणूस खुर्चीवर बसला आहे आणि बासरीवर खूप सुंदर संगीत वाजवत आहे. व्हिडिओमध्ये त्याच्या शेजारी एक गाय देखील उपस्थित आहे. इतकंच नाही तर तिथे एक कुत्रासुद्धा आहे जो गायीसोबत बसला आहे.
46 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दोन प्राणी बासरीवादन ऐकताना दिसतायत. संगीतामुळे दोन्ही प्राणी अतिशय शांत मूडमध्ये दिसत आहेत. इतकंच नाही, तर दोघंही संगीत ऐकायला आले आहेत, असं वाटतं.
हा व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे, कारण तो सहसा दिसत नाही. हा व्हिडिओ पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा) ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला असून त्यात लिहिले आहे की, “#AnimalRahat अभयारण्यातील या शांततेचा आनंद घेण्यासाठी एक मिनिट द्या. प्रत्येकालाच ही शांतता हवी असते.”
Take a minute to enjoy this calm and compassionate moment at the #AnimalRahat Sanctuary.
Everyone deserves to feel like this. pic.twitter.com/S5SSYF8Jln
— PETA (@peta) December 3, 2022
हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड लोकप्रिय झालाय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युझरने लिहिले की, ‘हा खूप सुंदर सीन आहे आणि तो लोकांच्या मनाला शांती देत आहे.’ इंटरनेटवर असे बरेच व्हिडिओ आहेत ज्यात प्राणी संगीताचा आनंद घेत आहेत.