ब्यूनस आयर्स : अर्जेंटीनाचे नवे राष्ट्राध्यक्ष जेवियर माइली सध्या चर्चेमध्ये आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमात स्टेजवरच त्यांनी असं एक कृत्य केलं की, सगळेच हैराण झालेत. राष्ट्राध्यक्षांनी सगळ्यांसमोरच गर्लफ्रेंडसोबत लिपलॉक सुरु केलं. तिथे उपस्थित असलेले प्रेक्षक हे दृश्य बघून हैराण झाले. त्या क्षणाचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चर्चेचा विषय बनलाय. लोक बऱ्याच गोष्टी बोलत आहेत.
डेलीमेलच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष जेवियर आपली गर्लफ्रेंड फातिमा फ्लोरेजच्या एका कॉन्सर्टसाठी शुक्रवारी रात्री रॉक्सी थिएटरला आले होते. त्यांनी पैसे देऊन तिकीट विकत घेतली. स्टेजवर गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक होण्याआधी त्यांनी एक भाषणही दिलं. येणारे दिवस अर्जेंटिनासाठी कठीण असतील. पण देशाला पुढे जायच आहे, असं ते म्हणाले. या कपलने पब्लिकली परस्परांना किस करण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान संपल्यानंतर ते अशाच अंदाजात दिसले होते.
तिथे काय जाहीर केलं?
लोकल न्यूजपेपर क्लेरिननुसार, राष्ट्राध्यक्षांची गर्लफ्रेंड फातिमा एक लोकप्रिय कॉमेडीयन आहे. नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर एका टॉक शो मध्ये जेवियर बरोबर तिची ओळख झाली होती. तेव्हापासून दोघे रोमँटिक रिलेशनमध्ये आहेत. ऑक्टोबरमध्ये दोघे एका टॉक शो मध्ये दिसले होते. तिथे त्यांनी जाहीरपणे परस्परांना डेट करत असल्याच जाहीर केलं होतं.
Argentina’s new President is Trump on Steroids pic.twitter.com/ux08bw4BnA
— Gabbar (@GabbbarSingh) December 31, 2023
आर्थिक शॉक ट्रीटमेंची गरज
फेब्रुवारी महिन्यात आपल्या वाढदिवशी नवऱ्यापासून अधिकृतरित्या वेगळ झाल्याच फातिमाने सांगितलं. त्यानंतर इंस्टाग्रामवर तिच जेवियरसोबत बोलण सुरु झालं. दोघांनी परस्परांना डेट करायला सुरुवात केली. आम्ही दोघे कधी इतके जवळ आलो, हे आम्हालाच समजलं नाही. जेवियर यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा विजय याकडे गेम चेंजिंग म्हणून पाहिलं गेलं. त्यांची तुलना डोनाल्ड ट्रम्पशी होऊ लागली. राष्ट्राध्यक्षांनी अलीकडेच म्हटलं होतं की, अर्जेंटिनाला आर्थिक शॉक ट्रीटमेंची गरज आहे.