मुंबई : 4 डिसेंबर 2023 | चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी भारतीय जनता पक्षाचं बळ आणखी वाढवलंय. तर काँग्रेसला उत्तर भारतातून जवळपास हद्दपार केलंय. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदारांनी दाद दिली. मोदींचा प्रभाव मतदारांवर असल्याचं या निकालांनी स्पष्ट केलं. दक्षिणेतील तेलंगणमधील सत्ताविजय हीच काँग्रेससाठी जमेची बाजू ठरली. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण ही तीन राज्ये काँग्रेसच्या हाती जातील आणि राजस्थान हे एकमेव भाजपकडे जाईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात भाजपला एकामागून एक विजय मिळाला. या निकालानंतर काँग्रेस आता हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक या तीन राज्यांतच एकहाती सत्तेत उरला आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे.
निवडणुकीचा निकाल पाहताना प्रत्येक भारतीय पित्याची अवस्था कशी होती, याबद्दलचा हा भन्नाट मीम
POV: Every Indian dad today watching election results on TV pic.twitter.com/X0m2pFNqFm
— Shubh (@kadaipaneeeer) December 3, 2023
एक्झिट पोल आणि प्रत्यक्षातील निकाल यातील फरकावरून काँग्रेसची उडवलेली खिल्ली
Exit polls to Congress 😂 pic.twitter.com/ka3hXW0l4R
— Sankott (@Iamsankot) December 3, 2023
भाजपने छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही प्रचाराची तीव्रता वाढवली होती. मोदी आणि अमित शहा यांच्या सभांचा धडाका, नियोजनबद्ध प्रचार आणि सरकारी योजनांची प्रसिद्धी यांच्या मदतीने भाजपने विजयाची पार्श्वभूमी तयार केली. त्यामुळे निकाल लागल्यानंतर आनंद साजरा करताना मोदी आणि शहा..
BJP WINNING ALL THREE STATES
MP , Rajasthan & ChattisgarhNarendra Modi and Amit shah right now:- #ElectionResults pic.twitter.com/B3jTKwqE4U
— Mangu Kumar Sahoo (@mangukumarsahoo) December 3, 2023
राजस्थानमधील भाजपच्या विजयामुळे दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी मतदारांनी कायम राखली. यावरूनही भन्नाट मीम्स व्हायरल..
BJP & Cong in Rajasthan every 5 years#ElectionResults pic.twitter.com/bhD9gIX40R
— Sagar (@sagarcasm) December 3, 2023
राजकीय नेत्यांच्या अवस्थेवर मीम्स..
Politicians right now. #ElectionResultspic.twitter.com/K0GmiRVEhi
— Roshan Rai (@RoshanKrRaii) December 2, 2023
मध्य प्रदेशात 230 पैकी 163 जागांसह भाजपने दोन तृतियांश बहुमत मिळवलं. तर छत्तीसगडमधील चित्रही भाजपच्या व्यूहरचनेनं फिरवून टाकलं. तिथे 90 पैकी 56 जागा जिंकत भाजपने सत्ता काबिज केली. राजस्थानात 115 जागा जिंकून भाजपने उत्तरेतील काँग्रेसचं मोठं राज्य ताब्यात घेतलं. एकामागून एक पराभव होत असताना तेलंगणमधील विजय काँग्रेसला किंचित दिलासा देऊन गेला. के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला मागे टाकून काँग्रेसने 64 जागांसह राज्य जिंकलं.