सोशल मीडियावर अनेकदा काहीतरी व्हायरल होते आणि मग तो ट्रेंड बनतो. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (एआय) फोटो ट्रेंडमध्ये आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने कलाकार इतकी सुंदर चित्रे बनवत आहेत की, खरे आणि खोटे यात फरक करणे अवघड आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबतचे हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कदाचित तुम्हाला असंही वाटेल हे फोटो चांगल्या आणि महागड्या कॅमेऱ्याने घेतले गेलेत. सध्या सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबतचे काही फोटो खूप व्हायरल होत आहेत, ज्यात नववधूने अंतराळवीरांचे हेल्मेट घातलेले दिसत आहेत.
चार फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात पहिल्या फोटोमध्ये एक वधू हातात अंतराळवीरांचे हेल्मेट घेऊन दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत वधूने हेल्मेट घातलेले आणि हातात फुलांचा गुलदस्ता घेतलेला दिसत आहे.
तिसऱ्या फोटोत वधूने हेल्मेट घातलेले दिसत आहे, पण तिचे हेल्मेट एकदम डिझायनर आहे, तर चौथ्या फोटोत तिच्या हेल्मेटमध्येही कानाजवळ दोन्ही बाजूंनी भरपूर फुले आहेत. जणू वधूने कानात फुले घातली आहेत.
ही छायाचित्रं लोकांना प्रचंड आवडलीत. जोपर्यंत तुम्हाला सांगितले जात नाही की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या साहाय्याने ही चित्रे तयार करण्यात आली आहेत तोपर्यंत तुम्ही गोंधळून जाल.
अंतराळवीर वधूंचे हे सुंदर फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर दक्वर्कबॉक्स नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आले असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘अॅस्ट्रोनॉट ब्राइड ड्रेस वीक’. या फोटोंना आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत.
कुणी ‘हे विलक्षण आहे’ असं म्हणतंय, तर कुणी ‘खरंच अनोखी संकल्पना आहे’ असं म्हणतंय. त्याचप्रमाणे एका युजरने मजेशीर पद्धतीने लिहिले आहे की, हे फोटो पाहून स्टार प्लसची सून नासामध्ये गेल्यासारखे वाटते, तर दुसऱ्या युजरने ‘हे खरंच जगाच्या पलीकडे आहे’, असं लिहिलं आहे.