हे 18 वर्षांपूर्वीचं लव्ह लेटर व्हायरल, वाचून तुम्ही खूप हसाल!

| Updated on: Apr 07, 2023 | 4:31 PM

जुन्या हस्तलिखित प्रेमपत्रातही अनेक प्रकारची मज्जा असते. अनेक गोष्टी रंजक असतात हे सिद्ध करणारा फोटो एका ट्विटर युजरने शेअर केला आहे. घराची साफसफाई करत असताना एका काकूंना त्यांचा प्रियकर "मिस्टर अय्यर" च्या जुन्या कपाटातून हाताने लिहिलेली काही प्रेमपत्रे सापडली.

हे 18 वर्षांपूर्वीचं लव्ह लेटर व्हायरल, वाचून तुम्ही खूप हसाल!
18 years old love letter
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: जुनी लव्ह लेटर कंटाळवाणी होती असं तुम्हाला वाटत असेल तर हे ट्विट तुम्हाला पुन्हा विचार करायला भाग पाडेल. जुन्या हस्तलिखित प्रेमपत्रातही अनेक प्रकारची मज्जा असते. अनेक गोष्टी रंजक असतात हे सिद्ध करणारा फोटो एका ट्विटर युजरने शेअर केला आहे. घराची साफसफाई करत असताना एका काकूंना त्यांचा प्रियकर “मिस्टर अय्यर” च्या जुन्या कपाटातून हाताने लिहिलेली काही प्रेमपत्रे सापडली. हाच अय्यर आता त्यांचा नवरा आहे. 18 वर्षांपूर्वी त्याने तिला पत्र लिहिले होते, पण हे काही सामान्य प्रेमपत्र नाही. ही प्रेमपत्र प्रयोगशाळेतील प्रयोग आणि आकृतींनी भरलेलं आहे.

पतीने 18 वर्षांपूर्वी लिहिलेलं प्रेमपत्र

टेक्स्ट मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या जमान्यात प्रेमपत्रासाठी एवढी मेहनत घेणारी व्यक्ती क्वचितच पाहायला मिळते. अय्यर यांनी खऱ्या प्रेमाला सीमा नसतात हे सिद्ध केले. लवी-डवीसारखी प्रेमपत्रे लिहिण्याऐवजी विज्ञानातील प्रयोग आणि आकृत्या काढून त्यांनी प्रेमपत्रं छान सजवलं आहे. जोडून त्यांनी प्रेमपत्रे लिहिली. त्याचा फटका कुणाला बसणार नाही? साई स्वरूपा नावाच्या एका महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, “आज मी काही जुन्या वस्तू साफ करत असताना मला काही जुनी हस्तलिखित प्रेमपत्रे सापडली जी श्री. अय्यर यांनी मला सुमारे 18 वर्षांपूर्वी लिहिली होती. पण आपल्या गर्लफ्रेंडला प्रेमपत्र लिहिताना त्यात आकृत्या कोण काढतं? प्रयोगशाळेतील प्रयोगांबद्दल कोण लिहितं? होय, मी या व्यक्तीला हो म्हणाले.”

अय्यर यांनी विज्ञान आणि रोमान्स यांची सांगड घालून एक प्रेमपत्र लिहिले, हे पत्र पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. एका युजरने लिहिले की, ‘अरे, हाताने लिहिलेल्या प्रेमपत्रांचे ते दिवस. आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही हो म्हटले यात अजिबात आश्चर्य वाटण्यासारखे नाही.’ एका तिसऱ्या युजरने लिहिले की, “हा एक अतिशय सुंदर आणि संस्मरणीय क्षण आहे, जो आपण अजूनही आठवत आहात.”