औरंगाबाद : काही लोकांना मांजर, कुत्रा असे प्राणी पाळायला आवडतं. काही लोक तर प्राणी आणि पक्षीमित्र म्हणून काम करत असतात. मात्र कधीकधी हादरवून सोडणाऱ्या घटना आपल्या कानी पडतात. आपल्या स्वार्थापोटी तसेच रागाच्या भरात लोक प्राण्यांना मारून टाकतात. सध्या मात्र एक अतिशय वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मांजरीचा जीव वाचवण्यासाठी औरंगाबादकरांनी मोठी मेहनत घेतली आहे. शहरातील सातारा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी कारमध्ये अडकलेल्या एका मांजरीची सुटका केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला व्हिडीओ औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील आहे. येथे नागेश पांडे यांचे घर आहे. घरासमोर ते कार पार्क करतात. काही कामानिमित्त आज ते कार घेऊन बाहेर जात होते. मात्र त्यांच्या कारमधून अचानकपणे मांजर ओरडण्याचा आवाज येत होता. शोधाशोध केल्यानंतरदेखील मांजर नेमकी कोठे आहे, हे समजत नव्हते. शेवटी ती कारच्या समोरच्या भागात अडकून बसल्याचे पांडे यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर कारमध्ये अडकलेल्या मांजरीची सुटका करण्यासाठी कॉलिनीतील लोकांनी खूप प्रयत्न केले. मांजर कारमध्ये अतिशय आत जाऊन बसल्यामुळे तीला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. शेवटी साहील पांडे या छोट्या मुलाच्या मदतीने मांजरीला बाहेर काढण्यात आले. तसेच तिला बाहेर सोडून देण्यात आले. मांजरीचा जीव वाचावा म्हणून रात्रीच्या अंधारात प्रभाकर सोळुंके यांनीदेखील पांडे यांना मदत केली.
औरंगाबादेत छोट्या मुलाने तसेच कारमालकाने मांजरीचा जीव वाचावा म्हणून तब्बल अर्धा तास प्रयत्न केले.
शेवटी मांजरीचा जीव वाचला..#Viral | #ViralVideo | #SocialMedia | #Cat pic.twitter.com/wIZQL7jycK
— prajwal dhage (@prajwaldhage100) October 25, 2021
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. तसेच प्राण्यांची हत्या करु नये, असे आवाहन केले जात आहे.
इतर बातम्या :
Video: आकाश भेदणाऱ्या गरुडाला कधी पोहताना पाहिलंय? गरुडाची आणखी एक कला दाखवणारा व्हिडीओ
India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोलhttps://t.co/8pvu299Y7V#IndiaVsPak | #indiaVsPakistan | #Varunchakravarthy | #T20WorldCup | #Pakistan
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2021
(aurangabad people rescued cat who stuck into car video went viral on social media)