सोशल मीडियाचे जगही अप्रतिम आहे. इथे कधी आणि काय अद्भुत गोष्टी पाहायला मिळतील, काही सांगता येत नाही. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे , ज्याला पाहून तुम्हालाही डान्स करायची इच्छा होईल. यामध्ये एक माणूस असा पाय हलवत आहे जणू काही त्याच्यात स्प्रिंग आहेत. माहितीनुसार, हा जौली डान्स आहे . सोशल मीडिया यूजर्स याला जगातील सर्वात कठीण डान्स म्हणत आहेत. हा डान्स पश्चिम आफ्रिकन देश आयव्हरी कोस्ट मध्ये केला जातो. जौली डान्स परफॉर्मन्सचा हा व्हिडिओ आफ्रिकेत एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान शूट करण्यात आला आहे.
यामध्ये पारंपारिक वेशभूषेतील एक व्यक्ती मुखवटा घालून आणि पायाला जबरदस्त ताकद लावून नाचताना दिसत आहे. डान्सर इतक्या वेगाने पाय हलवतो, जणू पायात स्प्रिंग आहे.
सोशल मीडिया यूजर्सना हा डान्स फॉर्म खूपच कठीण वाटत आहे. काही लोकांनी असा दावाही केला आहे की हा जगातील सर्वात कठीण नृत्य प्रकार आहे.
@TheFigen_ या हँडलने ट्विटरवर जॉली डान्सचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिटाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर दहशत निर्माण करत आहे.
This is “Zaouli” dance of Central Ivory Coast and is labelled as the most impossible dance in the world! pic.twitter.com/1F3SSzhF3O
— Figen (@TheFigen_) January 12, 2023
काही तासांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ 18 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, पोस्टला 52 हजारांहून अधिक लाईक्स आणि 10 हजार रिट्विट्स मिळाले आहेत.
युनेस्कोच्या मते, जौली हे बौफले आणि ज्युनेउला येथील गुरो समुदायाद्वारे सादर केले जाणारे लोकप्रिय नृत्य आहे. हे नृत्य स्त्रीसौंदर्याला श्रद्धांजली आहे. जौली नृत्यादरम्यान कलाकार दोन प्रकारचे मुखवटे घालतात. ब्लाऊ आणि जेला.