झोपडीच्या छतावर मुलगा रस्त्यावरील लाईटच्या प्रकाशात अभ्यास करतोय, IAS ऑफिसर म्हणाला…

| Updated on: Sep 04, 2022 | 3:25 PM

त्यावेळी ते "अरे हमारे जमाने में..." अशी सुरवात करतात. मग ते शाळेत 8-10 किलोमीटर चालत जाण्यापासून, फटके गणवेश घालण्यापासून तर चिमणीत अभ्यास केल्याचं सांगतात.

झोपडीच्या छतावर मुलगा रस्त्यावरील लाईटच्या प्रकाशात अभ्यास करतोय, IAS ऑफिसर म्हणाला...
IAS Awanish Sharan Posted Picture
Image Credit source: Social Media
Follow us on

शिक्षण (Education) ही अशी एकमेवं गोष्ट आहे जी माणसाला इतरांपेक्षा वरचढ बनवू शकते. शिक्षणात जी ताकद आहे ती क्वचितच एखाद्या इतर गोष्टीत असेल. आजही आपले आई वडील जेव्हा आपल्याला अभ्यासाचं महत्त्व सांगायचा प्रयत्न करतात त्यावेळी ते “अरे हमारे जमाने में…” अशी सुरवात करतात. मग ते शाळेत 8-10 किलोमीटर चालत जाण्यापासून, फटके गणवेश घालण्यापासून तर चिमणीत अभ्यास केल्याचं सांगतात. “अभ्यासाने आयुष्य बदलतं फक्त थोडी मेहनत घ्यावी लागते” असं एकंदरीत ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असतात. पूर्वी लोकं कंदील, चिमणी अशा गोष्टींचा वापर करून अभ्यास करायचे. आता सगळीकडे वीज आलीये. गावोगावी वीज (Electricity) पोहचलीये असं जरी आपण म्हणत असलो तरी आजही अशी बरीच ठिकाणं आहेत जी विजेपासून वंचित आहेत. पण म्हणतात ना अभ्यासाला पर्याय नसतो. अभ्यास करण्यासाठी मेहनत (Efforts) लागते आणि मेहनतीलासुद्धा पर्याय नसतो. असे असंख्य आयएएस ऑफिसर्स आहेत जे अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून गेलेत. आज ते आयएएस आहेत कारण त्यांना कुठलंही संकट अडवू शकलं नाही.

ते म्हणतात ना, “हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए”

व्यक्तीमध्ये काहीतरी बनण्याची इच्छा असावी. ती इच्छा जर असेल तर आपोआप मार्ग मिळतो. अशाच आशयाचा संदेश देणारा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय आयएएस अवनीश शरण यांनी.

फोटोत एक मुलगा झोपडीच्या छतावर अभ्यास करतोय. हा मुलगा रस्त्याच्या लाईटवर अभ्यास करतोय. मन लावून एकाग्रतेने हा मुलगा छतावर अभ्यास करतोय.

हा फोटो शेअर करत आयएएस अवनीश शरण लिहितात,”हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए”. मनुष्याला जर काही बनण्याची इच्छा असेल तर त्याने ती इच्छा अखेरपर्यंत जागत ठेवावी, तेवत ठेवावी. का? कारण हीच इच्छा पुढे जाण्यासाठी त्याला प्रोत्साहन देत राहते. मार्ग दाखवत राहते.

हा धडा फक्त लहान मुलांसाठी नाही सर्वांसाठी आहे. 6 हजारहून अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे, तर शेकडो लोकांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.