तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे हे पुण्यकर्म मानले जाते. माणूस असो वा जनावर, तहान लागली असेल तर तहान तर पाण्यानेच भागते. तहानलेल्याला पाणी देणे जगात यापेक्षा मोठा धर्म दुसरा कोणताच नाही. तसं पाहिले तर आजच्या काळात या धर्माशी लोकांचे नाते तुटत चालले आहे. विशेषत: प्राण्यांसाठी, लोकांना मदत करायला वेळ उरलेला नाही. काही लोक प्राण्यांना पाहून पळून जातात, पण हल्ली सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.
खरंतर या व्हिडीओमध्ये एक अपंग संन्यासी बाबा शेजारी बसलेल्या माकडाला पाणी पाजताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माकड काहीतरी खात आहे.
या काळात संन्यासी बाबा हळूच पाण्याचा ग्लास त्याच्या दिशेने पुढे करतात, त्याला पाणी पिण्यासाठी बोलावतात. यानंतर माकड जेव्हा त्यांच्याकडे पाहतं तेव्हा त्याला बाबांच्या हातात ग्लासभर पाणी दिसतं.
माकड लगेच ग्लासमध्ये तोंड घालून पाणी प्यायला जातो, बाबाही त्याला एखाद्या लहान मुलाला पाणी पाजतात तसं पाणी पाजतात. हा व्हिडीओ खूप सुंदर आहे. व्हिडीओ पाहून अनेक विचार पडतात.
पृथ्वीवर उपस्थित असलेल्या सर्व प्राण्यांची काळजी माणसाने घ्यावी, गरजेच्या वेळी त्यांना मदत करावी आणि त्यांना अन्न-पाणी द्यावे, ही खरी माणुसकी आहे. हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पैशाने श्रीमंत असणे सामान्य आहे, मनाने श्रीमंत असावं’.
24 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 89 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 8 हजाराहून अधिक लोकांनीही हा व्हिडिओ लाईक केला आहे.
त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी कमेंटमध्ये ‘जय श्रीराम’ लिहितंय, तर कुणी ‘हेच हिंदू धर्म शिकवतो’ असं म्हणतंय.