मनुष्य किंवा इतर प्राण्यांना संकटाच्या काळात सर्वात अगोदर त्यांच्या आईची आठवण येते. आईकडे गेल्यावर सर्वजण संकट विसरुन जातात. आई आणि मुलांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतात, ज्यांना प्रत्येकजण भरभरून प्रेम देतो. आता आई-मुलांच्या नात्याबद्दल आणखी एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तुम्ही एका माकडाचा पिल्लाचा आणि त्याच्या आईचं प्रेम पाहून भावनिक देखील व्हाल. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे आणि त्यांच्या लाईक्स-कमेंट्स द्वारे खूप प्रेमाचा वर्षाव होत आहे.
रस्त्यावरून जात असताना एका माणसाला जवळच पडलेल्या दगडांमधून काही विचित्र आवाज ऐकतो. दगडाजवळ गेल्यावर आवाज मोठा होतो आणि ती व्यक्ती पटकन तिकडे जाते आणि दगड काढून टाकते. दगड काढल्याबरोबर, त्याखाली एक माकडाचं पिल्लू बाहेर येतो. थोड्याच वेळात पिल्लाची आई देखील तिथं पोहोचते आणि त्या पिल्लाला मिठी मारते आणि त्याला सोबत घेऊन जाते.
Service to others is the rent you pay for your room here on earth?
Baby Lion Tamarian being returned to his mother. Can anyone get a better gift than the look of gratitude the mother has at the end? pic.twitter.com/2BVdc2LN2g
— Susanta Nanda IFS (@susantananda3) November 19, 2020
बेबी लायन टामरिन ही जगातील माकडांची सर्वात लहान प्रजाती आहे. या माकडांचे वजन फक्त 900 ग्रॅम असते. या माकडांच्या बहुतेक प्रजाती ब्राझीलमध्ये आढळतात. हा व्हिडिओ स्वतः वन अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘प्राण्यांना मदत करून आम्ही पृथ्वीवर असण्याचे ऋण फेडतो’. या व्हिडिओला आतापर्यंत हजारोहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
लोकांना पण हा व्हिडीओ खूप आवडत आहे. या व्हिडिओमध्ये, लोक आई आणि मुलाचे प्रेम पाहून भावनिक होत आहेत आणि त्यांच्या टिप्पण्यांद्वारे, वापरकर्ते या चांगल्या माणसाला योग्य वेळी मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘आईचे प्रेम वेगळे असते, मूल तिच्या छातीला स्पर्श करताच त्याच्या सर्व समस्या विसरते.
इतर बातम्या:
सोशल मीडियावर ‘मंचकिन’ची चर्चा, महिन्याला 3 लाख रुपयांची कमाई, फॉलोअर्सच्या बाबतीत स्टार्सना टक्कर
जेव्हा जंगलाचा राजा चालता चालता पाण्यात पडतो… पाहा मजेदार Video
Baby lion tamarin rescued and reunites with mother emotional video viral on social media