मुंबई : बचपन का प्यार या गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झालेला सहदेव वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. एका गाण्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळेल याची त्याने कधी कल्पनादेखील केली नसेल. मात्र, सहदेवला ओळखत नाही, असा एकही नेटकरी तुम्हाला सापडणार नाही. हाच सहदेव सध्या आणखी एका कारणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो गाणे गाताना नव्हे तर चक्क डान्स करताना दिसतोय. नेटकऱ्यांना सहदेवाचा हा नवा अवतार चांगलाच आवडला आहे. (bachpan ka pyar sahdev dancing on funny song video went viral on social media)
बचपन का प्यार या एका गाण्यामुळे सहदेव प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने सहज म्हणून गायलेलं गाणं नेटकऱ्यांना चांगलंच आवडलं होतं. बघता बघता सहदेवचं हे गाणं जवळपास प्रत्येकाच्यो ओठावर रेंगाळत होते. सध्या याच सहदेवचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सहदेव डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे सहदेव साध्या पद्धतीने डान्स करत नाहीये. तर त्याच्या हातामध्ये वेगवेगळे बँड्स तसेच डोळ्यावर चष्मा आणि डोक्यावर टोपी दिसत आहे.
पाहा व्हिडीओ :
सहदेव ‘In Da Getto’ या गाण्यावर मजेदार डान्स करत आहे. डोळ्यावर चष्मा आणि डोक्यावर टोपी घातलेला सहदेव नेटकऱ्यांना चांगलाच आवडलाय. तसेच त्याने केलेले नृत्य तर सर्वांचाच मूड फ्रेश करणारे आहे. कदाचित याच कारणामुळे नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला आहे. ‘viralboy_sahdev’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बघता बघता या व्हिडीओला 88 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
इतर बातम्या :
सिद्धूच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पूर, नेटकऱ्यांची बल्ले बल्ले!
Video: जेरीने टॉमला ‘जेरीस’ आणलं, अगदी समोर बसुनही उंदराने मांजराला गंडवलं, पाहा व्हिडीओ
Shilo Shiv Suleman : कोण आहे शिलो शिव सुलेमान, जिच्यासोबत अभय देओल रोमँटिक फोटो शेअर करत प्रसिद्धीच्या झोतात आला?https://t.co/yrExQ2r1ma#ShiloShivSuleman #AbhayDeol
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2021
(bachpan ka pyar sahdev dancing on funny song video went viral on social media)