मुंबई: कुत्र्याने मुलीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल ‘बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना…’ बॉलीवूडचा क्लासिक चित्रपट ‘शोले’ची पंचलाईन लोकप्रिय आहे. चित्रपटात हेमा मालिनी यांना गब्बर सिंग आणि त्याच्या गँगसमोर डान्स करायला भाग पाडलं जातं. वीरूची भूमिका साकारणारा अभिनेता धर्मेंद्र आपल्या डायलॉगने बसंतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हेमाला दरोडेखोरांसमोर नाचण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र सोशल मीडिया युजर्सनी जेव्हा ‘बसंती’ला कुत्र्यांसमोर नाचताना पाहिलं तेव्हा त्यांना त्यांचं हसू आवरेना.
‘रील्स मेनिया’ तरुणाईला वेड लावत आहे. कुठल्याही लोकप्रिय गाण्यावर किंवा डायलॉगवर नाचणं किंवा परफॉर्म करणं आणि ते सोशल मीडियावर शेअर करणं आजकाल खूप कॉमन आहे. आम्ही एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत ज्यात एक मुलगी कुत्र्यांसमोर नाचताना दिसत आहे. पुढे काय होऊ शकतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही मुलगी ‘रेस’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘जरा जरा टच मी टच मी टच मी’ या गाण्यावर नाचत आहे. ती मुलगी रस्त्याच्या कडेला गाण्यावर नाचत राहते, पण मग एक अपघात होतो.
नाचत असताना एक भटका कुत्रा मुलीकडे येतो आणि अचानक तिला चावतो. मुलगी घाबरून आहे तिथून पळून जाते. व्हिडिओमध्ये दिसतंय की ती प्रचंड घाबरलेली असते.
त्यानंतर मुलीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ती कुत्र्याच्या चाव्याच्या जखमा दाखवताना दिसत आहे. हा व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप चकीत झाले आणि त्यांचे हसणे थांबवू शकले नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या.