मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं? मृत्यूनंतर काय होतं? शरीरातून असं काय निघून जातं ज्यामुळे शरीर निर्जीव होतं? ती गोष्ट पकडून ठेवता येणार नाही का? माणूस कधीच मरणार नाही असं काही करता येणं शक्य नाही का? मृत्यूची चाहूल कशी लागते? त्यावेळी माणूस नेमकं कसा वागतो? काय होतं? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. जगात प्रत्येकाला हे प्रश्न पडतातच आणि त्याचं उत्तर मात्र काही मिळत नाही. त्यामुळे मृत्यू हे कायम गूढ बनून राहिलं आहे.
मृत्यूवेळी माणूस नेहमी खरं बोलत असतो. पण मरताना माणसाला नेमकं काय वाटतं? याचं प्रत्येकाला कुतुहूल आहे. प्रत्येकाला याची उत्सुकता आहे. माणूस त्यावेळी काय विचार करतो? त्याचे शेवटचे शब्द काय असतात? याबाबत एका नर्सने खुलासा केला आहे. मरताना बहुतेक लोक काय बोलतात? कोणते शब्द उच्चारतात ? त्यांना काय वाटतं? आणि त्यांना काय दिसतं? याची माहिती या नर्सने दिली आहे.
जुली असं या नर्सचं नाव आहे. ती लॉस एन्जलिसला राहते. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही गोष्ट सांगितली आहे. बहुतेक लोकांनी मरताना कोणता शब्द उच्चारला याची माहिती तिने दिली आहे. एवढंच नव्हे तर मृत्यू समोर दिसल्यावर लोक काही खास गोष्टींची आठवण करत असतात, असंही तिने सांगितलंय.
नर्स ज्युलीने तिच्या @hospicenursejulie या हँडलवर मृत्यूच्याबाबतचे अनुभव शेअर केले आहेत. लोक मरताना काही ना काही तरी पाहतात. यातील बहुतेक लोक जग सोडून गेलेल्या आपल्या प्रिय लोकांची आत्मा पाहतात. तर काही लोकांना आगंतुकही दिसतात. काही लोक या प्रकाराला घर वापसी समजतात. यावेळी त्यांची श्वास घेण्याची पद्धत बदलते. त्यांच्या त्वचेचा रंगही बदलतो. मृत्यूच्या काही तास आधी दिसणारे हे संकेत आहेत.
मरताना बहुतेक लोक आपल्या प्रिय व्यक्तींना पाहतात आणि त्यांच्यासोबतच्या चांगल्या काळातील आठवणींना उजाळा देतात. ते घरातील दिवंगत झालेल्या लोकांची आत्मा पाहतात. ते आपल्या जवळ येत आहेत, असं त्यांना वाटतं. I love you म्हणजे माझं तुझ्यावर अत्यंत प्रेम आहे, असं हे लोक मरणशय्येवर असताना म्हणतात. हेच तीन शब्द त्यांच्या तोंडी असतात आणि आपल्या आई आणि वडिलांना हाका मारतच या जगाचा निरोप घेतात, असं ज्युली म्हणते.