लग्नाआधी ती तिच्या पाचही boyfriends ला भेटायला गेली, कारण हे सांगितलं

| Updated on: Nov 09, 2022 | 9:49 AM

लग्नाआधी ती तिच्या 5 एक्स बॉयफ्रेंडला शोधण्यासाठी बाहेर गेली होती. एमी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला एक-एक करून भेटली.

लग्नाआधी ती तिच्या पाचही boyfriends ला भेटायला गेली, कारण हे सांगितलं
Amy
Image Credit source: Social Media
Follow us on

एका महिलेने लग्नकार्यासाठी अजब प्रयोग केला. जेणेकरून तिचं नवं नातं कधीच तुटणार नाही. तिनं तिच्या सर्व एक्स बॉयफ्रेंड्सना भेटून तिच्यातल्या उणीवा शोधून काढल्या. या महिलेला 5 बॉयफ्रेंड होते आणि ती त्या सगळ्यांना जाऊन भेटली. ३३ वर्षीय एमी निकेलला जुन्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी इच्छा आहे. त्यामुळे लग्नाआधी ती तिच्या 5 एक्स बॉयफ्रेंडला शोधण्यासाठी बाहेर गेली होती. जेणेकरून तिला तिच्या चुकांबद्दल विचारणा करता येईल.

एमी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला एक-एक करून भेटली. एमीने द सनला सांगितले- सर्वात आधी मी बेनशी संपर्क साधला. वयाच्या १६ व्या वर्षी मी पहिल्यांदा त्याच्याशी संबंध ठेवले होते. मी त्याला विचारले की ब्रेकअप माझ्यामुळे झाले होतं का? लवकरच माझ्यामुळेच ब्रेकअप झाल्याचं मला स्पष्ट झालं.

पहिल्या नात्याबद्दल बोलताना एमी म्हणाली, “8 महिन्यांच्या रिलेशनशिपदरम्यान, मी कधीच विश्वास ठेवला नाही की, त्याचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्याला आवड निर्माण व्हावी म्हणून मी अनेक बालिशपणा केला. यामुळे आमचं दोघांचंही ब्रेकअप झालं.

बेननंतर सॅम एमीच्या आयुष्यात आला. विद्यापीठात शिकत असताना हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण 2 वर्षानंतर एमीने सॅमसोबत ब्रेकअप केलं. “मला काहीतरी नवीन अनुभवायचं होतं या नादात माझं असणारं नातं खरंच किती चांगलं आहे, हे माझ्या लक्षातच आलं नाही. आता माझ्या लक्षात आले आहे की, मला जे मिळतंय त्यापासून मला लांब जायची गरज नाही आणि हातातलं सोडून दुसऱ्या गोष्टीमागे पळायची गरज नाही.”

एमी पुढे म्हणाली- सॅमसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी एका नव्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आले. २०१४ मध्ये मी प्रेग्नन्ट होते. माझ्या मुलाच्या वडिलांना या जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी व्हायचं नव्हतं. मी एकटी आई म्हणून आयुष्य जगू लागले. पण त्यानंतर काही महिने मी एका स्ट्रगलिंग संगीतकाराला डेट केलं.

आपल्या नात्याबद्दल बोलताना एमी म्हणाली, “2017 मध्ये एक वर्ष मी डेव्हिड नावाच्या एका व्यक्तीला डेट केलं. मला असे वाटले की मी त्याच्याबरोबर बऱ्याच काळासाठी रिलेशनशिपमध्ये राहू शकेन. पण पैशावरून आमचं नातं बिघडू लागलं. आणि मग सगळं संपलं. माझा मुलगा थोडा मोठा झाला तेव्हा ख्रिसबरोबर मी थोडा वेळ रिलेशनशिपमध्ये होते.

प्रयोग संपल्यानंतर एमीने मंगेतर जोनाथनला याबाबत सांगितलं. ‘आता मी योग्य व्यक्तीसोबत आहे. माझी नाटकं असूनही जो स्वत:ला शांत ठेवू शकतो. परिस्थिती कशीही असली तरी तो स्वत:ला सकारात्मक ठेवते आणि मला माहित आहे की मी जुन्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाही त्यामुळे आता मी लग्न करणार आहे.