Viral: कोण म्हणतं देशसेवा फक्त सैनिक करतात? हा जिगरबाज लाइन मॅन बघा, पुराच्या पाण्यात भर पावसात विजेच्या खांबावर चढला, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Aug 13, 2022 | 12:57 PM

एवढ्या पाण्यात तो जिगरबाज लाइन मेन त्या विजेच्या खांबावर चढला आणि त्याने वीजपुरवठा सुरळीत केला. या लाइन मेनचं सगळीकडे कौतुक होतंय. व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

Viral: कोण म्हणतं देशसेवा फक्त सैनिक करतात? हा जिगरबाज लाइन मॅन बघा, पुराच्या पाण्यात भर पावसात विजेच्या खांबावर चढला, व्हिडीओ व्हायरल
Bhandara Line Man Viral Video
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

आपण नेहमी म्हणतो की आपलं सैन्य आपली रक्षा करतं, कुठल्याही संकटातून आपल्याला वाचवतं. देशाची रक्षा सैनिक करतात. आपलं तर ब्रीदवाक्य पण “जय जवान, जय किसान” (Jai Jawan Jai Kisan) असं आहे. कधी विचार केलाय का की इतरही लोकं आहेत जी आपली रक्षा करतात, आपल्याला मदत करतात. देशातला छोट्यातल्या छोटा माणूस हा देशसेवा करत असतो, तो सैनिकच असावा असं बंधन नाही. प्रत्येकाने आपलं काम चोख पद्धतीनं पार पाडलं की झालीच देशसेवा! अनेकवेळा संकट काळातले व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झालेत ज्यात अनेक लोकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांना मदत केलीये. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात भर पावसात, गुडघाभर पाण्यात लाइन मेन (Line Man) विजेच्या खांबापर्यंत पोहत जातो. कशासाठी? वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी! आता वीजपुरवठा सुरळीत करणं देशाची सेवा करणं झालं का? होय तर! लोकांना वीज मिळावी आणि त्यासाठी आपला जराही विचार करणं म्हणजेच लोकांची सेवा, देशातील लोकांची सेवा! याच कारणामुळे या लाइन मेनचं विशेष कौतुक केलं जातंय.

एक जिगरबाज लाइन मेन धावून आला

भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात लोकांचे प्रचंड हाल झाले. अतिवृष्टी म्हटलं की वीजपुरवठा खंडित होणं अशा समस्या बरेचदा उद्भवतात. जवाहरनगर सावरी परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ज्या खांबावरुन विद्युत पुरवठा नादुरुस्त झाला होता तो खांब 3 फुट पुराच्या पाण्याने वेढ़ला गेला होता. मग अशा वेळी तिथे कोण जाणार? वीजपुरवठा तर सुरळीत करणं अत्यंत गरजेचं! अशा वेळी एक जिगरबाज लाइन मेन धावून आला ज्याने आपलं काम पाऊस, पाणी, अतिवृष्टी काहीच न बघता अगदी चोख पद्धतीनं पार पडलं. एवढ्या पाण्यात तो जिगरबाज लाइन मेन त्या विजेच्या खांबावर चढला आणि त्याने वीजपुरवठा सुरळीत केला. या लाइन मेनचं सगळीकडे कौतुक होतंय. व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

व्हिडीओ

 कौतुकाची थाप

भर पुराच्या पाण्यात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढून लाइन दुरुस्तीचे काम करणाऱ्या जिगरबाज लाइन मेनचा वीडियो सद्धा भंडारा जिल्ह्यात प्रचंड वायरल होतोय. भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टिने पुर परिस्थिति निर्माण झाली होती. दरम्यान जवाहरनगर सावरी परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ज्या खांबावरुन विद्युत पुरवठा नादुरुस्त झाला होता तो खांब 3 फुट पुराच्या पाण्याने वेढ़ला गेला होता. मात्र यावेळी विद्युत पूरवठा सुरळीत सुरु राहावा यासाठी जीवाची पर्वा न करता विद्युत विभागाचे कर्मचारी पुराचे पाणी पार करत त्या खांबाजवळ गेले, त्यापैकी एका लाइन मॅनने विद्युत खांबावरुन चढून विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे.आता या जिगरबाज विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याचा वीडियो प्रचंड वायरल झाला असून कौतुकाची थाप त्यांच्यावर पडत आहे.