चक्क हत्तीवर बसवून निवृत्त शिक्षकाला निरोप देण्यात आला. फक्त विद्यार्थीच नव्हे तर गावातीलही अनेकजण या मिरवणुकीत सामील झाले होते. निवृत्त शिक्षकाला निरोप देताना गावातील लोकांना भरुन आलं होतं. आपल्या विद्यार्थ्यांसोबतच गावातील लोकांशी घट्ट नातं जोडलेल्या या शिक्षकाला निरोप देताना अनेकांना जड गेलं. या शिक्षकाला अनोखा निरोप देण्यात आला. क्वचितच कुण्या शिक्षकाच्या निरोपसमारंभाला गजराज (Elephant) बोलावून त्यावरुन मिरवणूक काढत आभार व्यक्त केले गेले असतील. असाच हा दुर्मिळ किस्सा घडलाय, राजस्थानमध्ये… (Rajasthan)
राजस्थानच्या भिलवाडामध्ये असलेल्या एका निवृ्त शिक्षकाला अनोखा निरोप देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये लाडक्या असलेल्या या शिक्षकाला गावकऱ्यांनीही डोक्यावर घेतलं होतं. अशा शिक्षकाचा निरोप समारंभ यादगार करण्यासाठी चक्क हत्तीवरुन या शिक्षकाची जंगी मिरवणूक काढण्यात आली.
राजस्थानच्या भिलवाडामध्ये असलेल्या अरवड गावात एक शाळा आहे. या शाळेत भवरलाल शर्मा हे सगळ्या विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणारे, असे एक शिक्षक. भवरलाल नुकतेच निवृत्त झाले. 20 वर्ष शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे आणि चोख कर्तव्य बजावलेल्या या शिक्षकाप्रती आभार व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत गावातल्या लोकांनी अनोखी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत हत्तीवर भवरलाल यांना बसवून त्यांची जंगी मिरवणूक गावभर काढण्यात आली होती.
भवरलाल शर्मा यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबतच त्यांना आत्मविश्वास देण्याचं आणि प्रोत्साहित करण्याचं कामही केलं. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या या शिक्षकानं आपल्या निवृत्तीच्या वेळीही मोठं आणि कौतुकास्पद काम केलंय. निवृत्तीच्या वेळी मिळालेले दोन लाख रुपये भवरलाल यांनी चक्क शाळेतील विद्यार्थ्यांच्या कॉम्युटर लॅबसाठी दान दिले. फक्त दानच दिले नाहीत, तर त्यासाठी त्या पैशातून लॅब उभीही करुन दाखवली.
मोठ्या थाटामाटात, उत्साहात आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना राजस्थानच्या भीलवाडामधील अरवड गावात निघालेली ही मिरवणूक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील अनोख्या प्रेमाचं प्रतीक आहे. भवरलाल यांनी तर कल्पनाही केली नसेल, की आपण केलेल्या कामाप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना हत्तीवर बसवून कुणीतरी त्यांची मिरवणूक काढेल. पण खरंच झालंय! विद्यार्थी आणि गावातल्या प्रेमानं निवृत्त शिक्षक भवरलाल शर्माही भारावून गेले असणार, हे नक्की!
नितीन गडकरींनी जाहीर कार्यक्रमात अनिल देशमुखांचे मानले आभार; कारण काय?
आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून पुन्हा नियमांचं उल्लंघन, आधी औरंगाबादेत, आता जालन्यात कोणते नियम मोडले?