आजच्या काळाला सोशल मीडियाचा जमाना म्हटलं जातं. इथे काय कधी चर्चेत येईल हे सांगणं फार कठीण आहे. अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे, जी पाहून लोकांना भिडेंच्या काळाची आठवण झाली. तारक मेहता का उलटा चश्मा मधील भिडेचं पात्र तर तुम्हाला माहीतच असेल. त्यात सारखंच “हमारे जमाने में” म्हणणारा भिडे एका वेगळ्याच काळात असल्यासारखं सतत बोलून दाखवत असतो. व्हायरल होणारी ही गोष्ट बघून लोकांना आता भिडेंच्या याच काळाची आठवण झालीये.
आजकाल एका पावतीचा फोटो व्हायरल होत आहे, जिथे फक्त 18 रुपयांत सायकल खरेदी केली जात होती. व्हायरल होणारे हे बिल 7 जानेवारी 1934 चे आहे.
88 वर्षे जुने हे बिल सायकलच्या दुकानाचे आहे. पावतीमध्ये दुकानाचे नाव ‘कुमुद सायकल वर्क्स’ हे दुकान कोलकात्याचं आहे. इथे बिल मध्ये सायकलची त्यावेळीची किंमत केवळ 18 रुपये होती असं दिसून येतंय.
हा फोटो फेसबुक युजर ‘संजय खरे’ने शेअर केला आहे. हे चित्र पाहिल्यानंतर लोकांना खूप आश्चर्याचा धक्का बसलाय. लोकांनी कमेंट करून यावर चांगल्याच प्रतिक्रिया दिल्यात.
एका युझरने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, सायकलच्या चाकाप्रमाणे वेळेचे चाक किती पटकन फिरले आहे. आता इतक्या पैशांमध्ये सायकल पंक्चरही होत नाही.