मुंबई : प्रत्येकाला काहीतरी वेगळा छंद असतो. काही लोक त्यांचा छंद जोपासतात तर काही लोकांना जिम्मेदारी (Responsibility) आणि नोकरीमुळे आपल्या छंदापासून दूर जावे लागते. काही छंद चांगले असतात, जे लोकांना प्रेरणा देता. तुम्ही टीव्हीवर किंवा कुठेही बाइक रेस पाहिली असेल. बाईक रेस (Bike race) इतकी जास्त खतरनाक असते की बघताना अंगावर काटाच येतो. बाईक रेसमध्ये सहभागी स्पर्धेक अत्यंत धोकादायक (Dangerous) पध्दतीने गाडी चालवतात. सध्या असाच एक बाईक रेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण बघू शकतो की, बाईक रेसमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाचा अपघात होतो. वळणावर त्याला बाईक हाताळता येत नाही आणि तो पडतो. जोरात पडूनही त्याला दुखापत होत नाही. त्यानंतर एक मिनिटांचा उशीर न करता तो लगेचच जागेवरून उठून परत त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दुसरी बाईक घेण्यासाठी पळताना दिसतो आणि दुसरी बाईक घेऊन पुन्हा स्पर्धेमध्ये सामील होतो. खरोखरच या व्यक्तीची तारीफ करायला हवी.
Passion is a very strong Emotion. pic.twitter.com/JyHDcBZ6k2
— Awanish Sharan (@AwanishSharan) April 6, 2022
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, पॅशन ही खूप मजबूत भावना आहे. 1 मिनिट 7 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाख 32 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 28 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सही केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी म्हटंले आहे की, जिद्द आयुष्यात खूप जास्त महत्वाची आहे.
संबंधित बातम्या :
Video : सूट-बूट घालून पाणीपुरी विकणाऱ्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
Viral Video : नवरीचं साजरं रूप पाहून नवरदेव भावूक, केलेल्या कृतीने नवरीही लाजली…