जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स रिलेशनशिपमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार, 10 वर्षीय गेट्स पॉला हर्डला डेट करत आहेत. पॉला हर्ड या ओरॅकल सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ आणि हेवलेट-पॅकार्ड (एचपी) चे एकेकाळचे बॉस मार्क हर्ड यांच्या विधवा पत्नी आहेत. 2019 मध्ये पॉला हर्डचे पती मार्क हर्ड यांचे निधन झाले. ‘बिल गेट्स आणि पॉला हर्ड एकमेकांना डेट करत आहेत हे लपून राहिलेलं नाही. पण पॉला अद्याप त्यांच्या मुलांना भेटलेली नाही,’ असं पीपल न्यूज वेबसाइटने म्हटले आहे. बिल गेट्स आणि 60 वर्षीय पॉला हर्ड गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीची अंतिम फेरी एकत्र पाहताना दिसले होते.
दोन वर्षांपूर्वी बिल गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षांनंतर घटस्फोटाची घोषणा केली होती. आता दोन वर्षांनंतर गेट्स आणि हर्ड यांच्या नात्याच्या बातम्या येत आहेत.
बिल गेट्स आणि मेलिंडा यांना तीन मुले आहेत. यामध्ये 58 वर्षीय जेनिफर आणि 26 वर्षीय फोबी आणि 20 वर्षीय मुलगा रोरी यांचा समावेश आहे. जेनिफर सध्या पती नासरसोबत लवकरच पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
ऑक्टोबर 2019 मध्ये मार्क हर्डच्या मृत्यूपूर्वी पाउला हर्डला तिच्या दिवंगत पतीसह 30 वर्षांपासून दोन मुली
देखील होत्या. पाउला आणि मार्क हर्ड यांना कॅथरीन आणि केली या दोन मुली आहेत.
मार्क हर्ड यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. या नात्याची बातमी काही दिवसांपूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत गेट्स यांना विचारण्यात आली होती की, त्यांना पुन्हा प्रेम मिळण्याची आशा आहे का? त्याला उत्तर देताना गेट्स म्हणाले की, “अर्थातच मी रोबोट नाही”.