मुंबई: सकाळपासून ट्विटर नुसता गोंधळ सुरु आहे. लोक उठतायत आणि ट्विटरवर जाऊन कुणाचं ब्लू टिक तसंच आहे आणि कुणाचं ब्लू टिक रिमूव्ह झालंय हे बघतायत. ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी अखेर काही निर्णयांनंतर व्हेरिफाइड अकाऊंटवरून ब्लू टिक काढून टाकली आहे. ट्विटरवर अशी खाती होती ज्यांना सशुल्क सेवा न घेता ब्लू टिक मिळाली. ट्विटरच्या कारवाईनंतर अमिताभ बच्चन, विराट कोहली, शाहरुख खान, सलमान खान, सीएम योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक बड्या सेलिब्रिटींच्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्लू टिक काढताच मजेशीर मीम्सचा वर्षावही झाला आहे.
ट्विटरच्या या कृतीमुळे अनेक सेलिब्रेटींनी आपली ब्लू टिक गमावली असली तरी सर्वसामान्य युजर्स आता त्याचा जोरदार आनंद घेत आहेत. मायक्रो ब्लॉगिंग साइटवर हॅशटॅग #BlueTick युजर्सच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. मजेशीर मीम्सच्या माध्यमातून ब्लू टिक गमावलेल्यांची अवस्था लोक सांगत आहेत. चला तर मग पाहूया निवडक मीम्स.
Virat kohli without Blue tick? pic.twitter.com/QU96OEUITw
— Arun Singh (@ArunTuThikHoGya) April 20, 2023
Bollywood celebrities after their blue tick is removed? #BlueTick pic.twitter.com/Q1ZON6g0iJ
— Lokesh Saini (@LokeshVirat18K) April 21, 2023
Blue tick of some celebs is removed from their profile ??#BlueTick pic.twitter.com/1xXoWVtvqm
— RADHE ࿗?? (@Iamradhe_p00) April 21, 2023
Bollywood celebrities with #BlueTick vs Bollywood celebrities without Blue Tick pic.twitter.com/WR5zPk8T60
— Raghav Masoom (@comedibanda) April 21, 2023
ट्विटर राजकारणी, अभिनेते, पत्रकरांसह इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींना व्हेरिफाइड अकाऊंट सेवा पुरवत होतं. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. पण एलन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी कंपनीत अनेक मोठे बदल केले आहेत. यात ब्लू टिक पेड सर्व्हिसचाही समावेश आहे. उदाहरणार्थ, आता कोणीही पैसे देऊन ब्लू टिक खरेदी करू शकतो.
एकेकाळी ट्विटरवर व्हेरिफाइड अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टला खूप महत्त्व होतं. पण ट्विटरच्या नव्या सब्सक्रिप्शन मॉडेलनंतर आता खूप कमी फॉलोअर्स असणारे युजर्सही ब्लू टिकचा दावा करू शकतात. भारतात ब्लू टिक सब्सक्रिप्शन 650 रुपयांपासून सुरू होणारे.