मुंबई: घरात बसून मोबाइलच्या माध्यमातून स्क्रीनवर स्क्रोल करताना धोक्यांशी खेळणे जितके सोपे वाटते तितके ते सोपे नसते. समोरून धोके दिसले तर नक्कीच घाम येईल. पृथ्वीवर असे काही धोकादायक प्राणी आहेत, ज्यांना पाहून लोक पळून जाण्याचा प्रयत्न करतात. सिंह, चित्ते, हत्ती, साप यांसारख्या प्राण्यांकडे पाहून लोकांना घाम फुटतो. पण तुम्ही कधी मगरींना जवळून पाहिलं का? जर तुम्ही ते पाहिलं असेल तर तुम्ही मगरींसोबत प्रवास करायचा कधी विचार केलाय का? तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना? होय, एका व्यक्तीने न घाबरता मगरीला बाईकवर ठेवले आणि मग तिच्यावर बसून गाडी चालवली.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने लोकांचे डोळे पाणावले. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगा मगरीसोबत रस्त्यावर फिरताना दिसत आहे.
त्याने भयानक आणि महाकाय मगरीला आपल्या दुचाकीवर बांधले आहे. त्याने मगरीला बाईकच्या सीटवर बसवले आणि मग स्वत: त्याच्या वर बसला. मुलाने मगरीचे तोंड बांधले असून तो भरधाव वेगाने रस्त्यावर गाडी चालवत आहे.
पाठीमागून कोणीतरी त्याचा एक व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला, जो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहिला तर लक्षात येईल की मुलाने दुचाकीवर बांधलेली मगर तस्करीसाठी नेली जात असावी. हा व्हिडिओ नेमका कुठून आहे हे अद्याप समजू शकलेलं नसलं तरी मीम पेजने तो शेअर केला आहे.
इन्स्टाग्रामवर oy._.starrr नावाच्या पेजने हे पोस्ट केले असून आतापर्यंत त्याला एक लाख 41 हजार लोकांनी लाइक केले आहे, तर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एक यूजरने रागात लिहिलं, ‘ही क्रूरता आहे. लोक त्यातून मजेशीर मजकूर कसा बनवतात याची कल्पनाही करू शकत नाही. थोडी तरी माणुसकी दाखवा.”