दिवाळीच्या दिवशी आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना भेटवस्तू म्हणून शुभेच्छा देतो. चॉकलेट्सचं नाव ऐकताच आपल्या मनातलं पहिलं नाव येतं ते कॅडबरी. कॅडबरीच्या सेलिब्रेशन बॉक्सची दिवाळीत खूप देवाणघेवाण होते, पण अशा अनेक गोष्टी घडतात की कंपनीच्या काही गोष्टी युजर्सना आवडत नाहीत. मग लोकं अशा गोष्टींवर बहिष्काराची मागणी करू लागतात आणि मग हे प्रकरण ट्रेंडमध्ये येतं. पण आजकाल लोकांमध्येही असाच एक ट्रेंड चर्चेत आहे. ज्यामध्ये लोक #BoycottCadbury ची मागणी करत आहेत, तेही दिवाळीनंतर.
कॅडबरी ब्रँडला टीकेचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नसली, तरी यावेळी हा मुद्दा थोडा वेगळा आहे. कारण यावेळी ब्रँडवर त्याच्या प्रोडक्टमुळे नव्हे तर जाहिरातीमुळे टीका होत आहे.
खरंतर दिवाळीत कॅडबरीची विक्री वाढवण्यासाठी जाहिरात करण्यात आली होती. ज्यात तुम्ही पाहू शकता की एक म्हातारा दिवा विकताना दिसतोय ज्याचं नाव दामोदर आहे.
पंतप्रधान मोदींच्या वडिलांचे नावही दामोदर आहे. याच कारणामुळे या जाहिरातीवर टीका होत असून ट्विटरवर #BoycottCadbury ट्रेंड होत आहे.
कॅडबरीची ही जाहिरात शेअर करत भाजप नेत्या डॉ. प्राची साध्वी यांनी ट्विट करत अशा जाहिरातींमुळे पंतप्रधान मोदींच्या वडिलांचे नाव खराब होत असून लोकांमध्ये चहावाला का बाप दियावाला असा संदेश दिला जात आहे.
Have you carefully observed Cadbury chocolate’s advertisement on TV channels?
The shopless poor lamp seller is Damodar.This is done to show someone with PM Narendra Modi’s father’s name in poor light. Chaiwale ka baap diyewala.
Shame on cadbury Company #BoycottCadbury pic.twitter.com/QvzbmOMcX2
— Dr. Prachi Sadhvi (@Sadhvi_prachi) October 30, 2022
भाजप नेत्याच्या या ट्विटनंतरच हा मुद्दा व्हायरल झाला. शेकडो लोकांनी आता ते रिट्विट केले आहे त्यामुळेच #BoycottCadbury मागणी करत आहेत.
#BoycottCadbury pic.twitter.com/2sGxniGDm7
— Abhay Narayan Kulkarni (@AbhayNarayanKu5) October 30, 2022
Buy Indian products, support India#BoycottCadbury https://t.co/qgqS95Y2ft
— An Arya (@iAbhishek_Arya) October 30, 2022
Cadbury’s every products are halal certified.
Fully support this trend#BoycottCadbury pic.twitter.com/guBHyMO0tB— Sanjay Jena (@Jenasanjay88) October 30, 2022
याशिवाय कॅडबरी आपल्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटिनचा वापर करतात, असा आरोपही ट्रेंड करणारे लोक करतायत.