Nagin Dance Viral: अंगात नागीन संचारली, पोरं पार खुळ्यागत नाचू लागली! अहो काही तर सरपटत होती, नागीन डान्स होता ना…

| Updated on: Jul 12, 2022 | 1:54 PM

काय त्या ट्र्कच्या हॉर्नचा आवाज, काय त्या हॉर्नवर पोरांचा खुळ्यागत डान्स...निस्ती नागीण नागीण! एकजण तर शेवटी सरपटताना दिसतो. शेवटी बघणाऱ्यालाच असं होतं,"अरे हो हो...बास्स बास!" हसून हसून वेड लागेल असा व्हिडीओ झालाय व्हायरल!

Nagin Dance Viral: अंगात नागीन संचारली, पोरं पार खुळ्यागत नाचू लागली! अहो काही तर सरपटत होती, नागीन डान्स होता ना...
nagin dance boys viral video
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

ओ भाई! महाराष्ट्राचा फेमस नागीण डान्स(Nagin Dance), एक्सक्लुझिव्ह नागीण डान्स जो महाराष्ट्राने शोधून काढलाय आणि तो कोणत्याही सणावाराला केला जातो. ह्या नागीण डान्समध्ये खूप स्टेप्स असतात. यात फण काढून नाचता येतं असतं, यात डान्स येत नसेल तर सरपटता येतं जमिनीवर, फार अंग हलवायला लागत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या नागिणीचे डान्स आपल्याला ह्यात करता येतात असा हा “फेमस नागीण डान्स”. पावसाळ्याचे (Rainy Season)दिवस पोरं पोरं गेली आपली निसर्गाचा आस्वाद घ्यायला. भेटला असेल एखादा ट्रक वाला… पोरांना काय निमित्त पाहिजे हुल्लडबाजी करायचं! काय त्या ट्र्कच्या हॉर्नचा (Truck Horn)आवाज, काय त्या हॉर्नवर पोरांचा खुळ्यागत डान्स…निस्ती नागीण नागीण! एकजण तर शेवटी सरपटताना दिसतो. शेवटी बघणाऱ्यालाच असं होतं,”अरे हो हो…बास्स बास!” हसून हसून वेड लागेल असा व्हिडीओ झालाय व्हायरल!

ती नागीण ट्यून, ट्रक आणि ती नाचणारी पोरं!

भारतीय कोणत्याही प्रकारचा डान्स करू शकतात. जर गाणं असेल तर डान्स करायला फक्त एक कारण आवश्यक आहे. डान्स ही करणे खूप मजेदार गोष्ट आहे, विशेषत: जेव्हा आपण आपल्या मित्रांसह ती करतो असतो तेव्हा! असाच एक वेडसर डान्स व्हिडिओ व्हायरल झाला असून, एका ट्रकच्या हॉर्नच्या संगीतावर नागीण डान्स करताना मुलांचा एक ग्रुप मजेशीर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मुलांचा एक ग्रुप आहे, रस्त्याच्या कडेला त्यांच्या बाईक पार्क केलेल्या दिसत आहेत. ते सगळे एका घाटात उभे आहेत. त्या घाटात पुढून एक ट्रक येतो, हा ट्रक येतानाच नागिन डान्स ट्यून वाजवत येतो. ती ट्यून इतकी भारी असते की पोरांना थांबवलं जात नाही आणि पोरं नाचायला सुरुवात करतात. अक्षरशः ते आजूबाजूला काहीच बघत नाहीत. पावसाळ्यात निसर्गरम्य दृश्य असणारा तो घाट, ती नागीण ट्यून, ट्रक आणि ती नाचणारी पोरं! व्हिडीओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो. काही जण नाचत असताना ओरडताना दिसत आहेत, तर काही जण रस्त्यावर रेंगाळत आणि सरपटताना दिसत आहेत. सरपटणार नाही का? नागीण डान्स आहेना!

हे सुद्धा वाचा

हा व्हिडिओ किरण अरुण कडूपाटील या ट्विटर युजरने शेअर केला असून, त्याला कॅप्शन दिले आहे, ज्यात लिहिले आहे की, “एका निमित्ताची गरज आहे.” कॅप्शनवरून असं वाटतं की, महाराष्ट्रात कुठेतरी हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता.

हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात 40,000 हून अधिक व्ह्यूज आहेत आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी स्वत:च्या मित्रांची आठवण काढत हलक्या फुलक्या पद्धतीने घेतला, तर काहींनी रस्त्यावरील अशा गोंधळामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एका युजरने लिहिले की, ”मुलं,मुलं असतात, तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, “त्या दिवसांची आठवण येत आहे.”