साओ पावलो : कोरोना या जागतिक संकाटाशी लढण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अहो-रात्र मेहनत करुन कोरोनावरी लशीचे उत्पादन केले आहे. सध्या कोरोनाशी लढण्यासाठी सर्व काळजी घेण्यासह कोरोना लस एक महत्त्वाचं शस्त्र आहे. त्यामुळे सर्व देश युद्धपातळीवर आपल्या नागरिकाचे लसीकरण करत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काहीजण इंजेक्शन घेण्यापासून घाबरत असल्याचे समोर येत आहे. अशाच एका लस घेतल्यानंतर घाबरुन बेशुद्ध झालेल्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Brazilian man Maguila Júnior Fainted After Getting Corona Vaccine Video Goes Viral)
ब्राझीलमध्ये राहणारे मागुइला जूनियर (Maguila Júnior) यांना इंजेक्शन टोचून घेण्यापासून खूप भिती वाटते. त्यामुळे कोरोनावरील लशीचा पहिला डोस घेण्यासाठी ते जातात तेव्हा त्यांची हालत खराब होते. साओ पावलो येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेले मागुइला आपला नंबर यायची वाट पाहत असतात. त्यानंतर त्यांना लस दिली जाते आणि ते अचानक जमिनीवर कोसळतात. त्यांना पाहून सर्व नर्सेस घाबरतात. यावेळी त्यांच्या सोबतचा व्यक्ती सर्व व्हिडीओ शूट करत असतो. मागुइला यांना जमिनीवर पडलेले पाहूल नर्सेस घाबरतात. त्यावेळी शूट करणारा मागुइला यांचा मित्र त्यांना सांगतो की त्यांना इंजेक्शनची भिती वाटते. त्यामुळेच मी व्हिडीओ रेकॉर्ड करत होतो जेणेकरुन मी नंतर तो त्याला दाखवू शकेन. त्यानंतर काही वेळातच मागुइला ठिक होतात. त्यांना बसवून पाणीही पाजले जाते.
अशाप्रकारे इंजेक्शनला घाबरणारे बरेचजण आहेत. भारतातही असे कितीतरी लोक असून मागील काही दिवसांपासून असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी भारतातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक महिला कोरोनाची लस घेण्यासाठी रुग्णालयात गेली. पण इंजेक्शन टोचून घेण्याची भिती वाटू लागल्याने ती लस घ्यायला नकार देऊ लागली. ज्यानंतर नर्सेसनी पकडून तिला लस टोचली. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
इतर बातम्या :
Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल
Video | 28 बायका, 135 मुलं-मुली, तरीही लग्नाची हौस फिटेना, आता करतोय 37 वे लग्न, पाहा मजेदार व्हिडीओ
(Brazilian man Maguila Júnior Fainted After Getting Corona Vaccine Video Goes Viral)