दक्षिण आफ्रिकेच्या एका नाइट क्लबमध्ये (Night Club) 17 जण मृतावस्थेत आढळले आहेत. दक्षिणेकडील पूर्व लंडन शहरातील (London City) एका टाऊनशिपमधील एका नाइट क्लबमध्ये मध्ये ही घटना घडल्याने खळबळ उडालीये. तब्बल 17 जण मृतावस्थेत आढळले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही बातमी प्रचंड व्हायरल होत आहे कारण नाइट क्लबमध्ये ही घटना घडलीये जी संशयास्पद आहे. ब्रिगेडियर टेम्बिन्कोसी किनाना यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, “त्यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला याचा तपास सुरू आहे.” सीनरी पार्क येथील या घटनेची माहिती पोलिसांना (Police) देण्यात आलीये.
क्लबच्या बाहेर जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणारे पोलिस अधिकारी यांचे फुटेज स्थानिक वाहिन्यांनी दूरचित्रवाणीवर प्रसारित करण्यात आले होते आणि त्यामुळे ही बातमी अधिक व्हायरल होत गेली. प्रांतीय पोलिस प्रमुख ब्रिगेडियर थर्बिन्कोसी किनाना यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्हाला पूर्व लंडनमध्ये स्थित असलेल्या सीनरी पार्कमधील एका स्थानिक मद्यालयात मरण पावलेल्या 17 लोकांबद्दल माहिती मिळाली. ते पुढे म्हणाले की, अधिकारी अजूनही घटनेच्या सभोवतालच्या परिस्थितीचा तपास करीत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मृत व्यक्तींचे वय 18 ते 20 वर्षे दरम्यान होते. शहरातील क्लबबाहेर जमलेल्या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून केला जात आहे.
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. वयाच्या 32 व्या वर्षी 12 मुलींशी लग्न करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी अटक केलीयं. अटक करण्यात आलेला तरुण हा किशनगंजचा रहिवासी आहे. अल्पवयीन मुलींशी लग्न करून तो त्यांना वेश्याव्यवसायात ढकलायचा. या आरोपीचा शोध पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून घेत होते. आता तो पोलिसांच्या हाती लागला असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत. त्याच्याकडून अजून काही गुन्हांची कबुली मिळण्याची शक्यता आहे.