Romantic Pose देताना स्टेजवरच झाली अशी फजिती, लोकं म्हणाले, “झालीच फोटोग्राफी”!

| Updated on: Oct 24, 2023 | 11:27 AM

अनेक मजेदार व्हिडीओ देखील असतात. लग्नाचे व्हिडीओ तर इतके हटके असतात की बास्स. लोकांना सुद्धा हे व्हिडीओ आवडले तर ते प्रचंड प्रमाणात शेअर होतात. हाच व्हिडीओ बघा, या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरी फोटो काढताना पोज देतायत, पुढे काय होतं तुम्हीच बघा...

Romantic Pose देताना स्टेजवरच झाली अशी फजिती, लोकं म्हणाले, झालीच फोटोग्राफी!
romantic pose
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोकांना सुद्धा आता खूप प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर काय नाहीये? या प्लॅटफॉर्म्समुळे आपल्याला सुद्धा लोकांचं टॅलेंट कळतं. कधी गाण्याचे, कधी डान्सचे, कधी कुठल्या आणखी गोष्टीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजकाल तर लग्नाच्या व्हिडिओंची वेगळी कॅटगरी आहे. लग्नातील डान्स, चांगले क्षण, फोटोशूट, गाणी सगळं व्हायरल होतं. यात अनेक मजेदार व्हिडीओ देखील असतात. लग्नाचे व्हिडीओ तर इतके हटके असतात की बास्स. लोकांना सुद्धा हे व्हिडीओ आवडले तर ते प्रचंड प्रमाणात शेअर होतात. हाच व्हिडीओ बघा, या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरी फोटो काढताना पोज देतायत, पुढे काय होतं तुम्हीच बघा…

लग्नाचा फोटोशूट

लग्नाची पण मोठी गंमत असते. जेव्हा लग्नाचा फोटोशूट सुरु असतो, तेव्हा वेगवेगळे पोज द्याव्या लागतात. या पोज देताना नवरदेव आणि नवरी दोघांची चांगलीच धांदल उडते. आधीच लग्नाचा वेगळा गोंधळ असतो त्यात फोटो आणि व्हिडीओ काढताना नाकी नऊच म्हणायचं. आजकाल फोटो काढल्याशिवाय कुठला सण सुद्धा पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही मग लग्न तर दूरच राहिलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोक यावर लाखो रुपये खर्च करतात. आता हाच व्हिडीओ बघा, या व्हिडीओ मध्ये तर कहरच झालाय.

बघताना खूप हसू येईल असा हा व्हिडीओ

लग्नसोहळा सुरु आहे. नवरदेव नवरी वरती स्टेजवर उभे आहेत. त्यांचा फोटोशूट सुरु आहे. आता तुम्हाला तर माहितच आहे फोटो काढायचे म्हणजे किती प्रकारचे पोज द्यावे लागतात. या पोज देताना आणि त्यांच्या पोज बघताना खूप मजा येते. व्हिडीओ मध्ये नवरदेव नवरीला गोल फिरवतो आणि फोटोसाठी पोज द्यायला जातो. पोज देताच नवरदेव धाडकन खाली पडतो, तो त्याच्यासोबत नवरीला सुद्धा घेऊन खाली पडतो. बघताना खूप हसू येईल असा हा व्हिडीओ आहे.