हल्ली लग्नसराईचा सीजन आहे. हा सीझन येताच सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित व्हिडीओजचा पूर येतो. फेसबुक असो वा इन्स्टाग्राम असो वा ट्विटर, सोशल मीडियाच्या अशा सर्व प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतात, त्यातील काही अतिशय गमतीशीर तर काही भावनिकही असतात. विशेषत: वधूचा निरोप घेताना भावनिक दृश्य पाहायला मिळतं. बरं, तुम्ही वधू-वरांना आनंदाने लग्न करताना पाहिलं असेलच, पण लग्नात त्यांना मारहाण करताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? होय, असाच एक व्हिडिओ हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो बघून लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
खरंतर या व्हिडीओमध्ये वधू-वर स्टेजवरच एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. नवरदेव वधूला जबरदस्तीने मिठाई भरवतो. या सगळ्यानंतर त्यांची भांडणं सुरू होतात.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू-वर स्टेजवर उपस्थित आहेत आणि नवरदेव कसा बळजबरीनं नवरदेवाला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करत आहे, पण नवरीला हे अजिबात आवडत नाही आणि ती लगेच नवरदेवाचा हात काढून त्याला जोरदार चोप देते.
एकाऐवजी दोनदा नवरदेवाला थप्पड मारते. यानंतर लग्नाचा स्टेज हा ‘लढाईचा आखाडा’ बनतो, त्यात वधू-वरांमध्ये भरपूर बॉक्सिंग होते, केस ओढले जातात.
Kalesh B/w Husband and Wife in marriage ceremony pic.twitter.com/bjypxtJzjt
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 13, 2022
हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 27 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 31 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनीही हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.