लग्नाशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात, ज्यात वधूच्या निरोपाशी संबंधित व्हिडिओंचाही समावेश असतो. नववधूचा निरोप हा असा क्षण असतो, ज्यात नवरी आणि तिचे कुटुंबीयच रडताना दिसत नाहीत, तर तिथे उपस्थित सर्व लोकांच्या डोळ्यात अश्रूही येतात. सोशल मीडियावर लोक जेव्हा त्याच्याशी संबंधित व्हिडिओ पाहतात तेव्हा त्यांचे डोळे भरून येतात, पण हल्ली एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नववधू निरोप घेतीये. यात तिने एक डान्स परफॉर्मन्स केलाय, जो खूप व्हायरल झालाय. हा परफॉर्मन्स असा आहे की तो करताना फक्त नवरीच नाही तर तिथे उपस्थित सर्व पाहुणेही रडतात.
हल्ली लग्नसमारंभात वधू-वर नाचणं सामान्य झालं आहे. यात कपल स्टेजवर जोरदार डान्स करताना दिसतं. याशिवाय केवळ नववधूंच्या नृत्याचे सादरीकरणही रंगमंचावर पाहायला मिळते.
असाच काहीसा प्रकार या व्हायरल व्हिडीओमध्येही पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या सुपरहिट ठरलेल्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातील ‘तुझमे रब देखता है’ हे हिट गाणं बॅकग्राऊंडमध्ये वाजत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि नवरी स्टेजवर चढून त्या गाण्यावर रडण्याचा परफॉर्मन्स देत आहे.
खरं तर हे गाणं आणि त्याचा अभिनय तिने आपल्या आई-वडिलांना समर्पित केला आहे. ती असा डान्स करते की, आजूबाजूला उपस्थित पाहुण्यांच्या डोळ्यात अश्रू येतात.
नववधूचा हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर d_d_makeover_ नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 4.4 मिलियन म्हणजेच 44 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 3 लाख 80 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.